वृत्तसंस्था
चंदिगड : Amit Shah हरियाणाच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीसाठी भाजपने अमित शहा ( Amit Shah ) यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवही त्यांच्यासोबत असतील. उत्तर प्रदेशनंतर शहा हरियाणामध्ये निरीक्षक म्हणून येत असल्याची गेल्या 5 वर्षांतील ही दुसरी वेळ आहे.Amit Shah
राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 17 ऑक्टोबर रोजी पंचकुला येथील परेड ग्राऊंडवर होणार आहे. त्याआधी 16 ऑक्टोबरला चंदीगडमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन्ही निरीक्षक उपस्थित राहणार आहेत.
वास्तविक, पक्षाने नायब सैनी यांना राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले होते. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांचीच नेतेपदी निवड होऊ शकते. पण, अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चाही रंगत आहेत.
हरियाणा निवडणुकीत शहा यांच्या हस्तक्षेपाची ही पहिलीच घटना नाही. याआधीही निवडणुकीदरम्यान शहा यांनी नायब सैनी यांना पंचकुलामध्ये मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केले होते. यानंतर शहा शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट वाटपात सक्रिय राहिले.
दक्षिण हरियाणाच्या अहिरवाल पट्ट्यातही केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत यांचे कट्टर विरोधक राव नरबीर यांनी थेट शहा यांची भेट घेऊन तिकीट मिळवले होते. त्यांनी बादशाहपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. आता त्यांना मंत्री होण्याचीही शक्यता आहे.
याशिवाय तिकीट वाटपाचे प्रकरण जवळपास अंतिम झाले असताना आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये 67 नावे अंतिम झाली असताना शहा यांनी पक्षाला पुन्हा सर्वेक्षण करण्यास सांगितले. त्यानंतर नव्याने उमेदवार ठरवून जाहीर करण्यात आले. ज्याच्या निकालावरून असेही दिसून आले की, काँग्रेसच्या लाटेच्या दाव्यात भाजपने 90 जागांच्या विधानसभेत 46 पेक्षा जास्त म्हणजे 48 जागा जिंकल्या.
दुसरीकडे, शपथविधीच्या तयारीदरम्यान माजी गृहमंत्री अनिल विज यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. राज्यसभा खासदार किरण चौधरी आणि त्यांची मुलगी भाजप आमदार श्रुती चौधरी यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली.
Amit Shah will choose the Chief Minister of Haryana
महत्वाच्या बातम्या
- Baba Siddiqui : मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या; 2 आरोपींना अटक, लॉरेन्स टोळीचा हात असल्याचा संशय
- Baba Siddiqui : NCP अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या; फेब्रुवारीत कॉंग्रेस सोडून NCPमध्ये केला होता प्रवेश
- Eknath shinde : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फटकेबाजी!!
- Reserve Bank of India : देशाच्या परकीय चलन गंगाजळीत 8 आठवड्यांत पहिल्यांदाच घट; 701 अब्ज डॉलरवर, गत आठवड्यात विक्रमी उच्चांक