• Download App
    Amit Shah कोणते दहशतवादी केव्हा पळाले??, अमित शाहांनी लोकसभेत काढला काँग्रेसच्या सरकारांचा सगळा हिशेब!!

    कोणते दहशतवादी केव्हा पळाले??, अमित शाहांनी लोकसभेत काढला काँग्रेसच्या सरकारांचा सगळा हिशेब!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : operation sindoor च्या चर्चेत सहभागी होत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणते दहशतवादी केव्हा पळाले, यांचा सगळा हिशेब काढला. काँग्रेसच्या सरकारांना त्यांनी चोहोबाजूंनी घेरले.

    अमित शाह म्हणाले :

    दाऊद इब्राहिम 1986 मध्ये पळाला. त्यावेळी राजीव गांधींचं सरकार होतं. सय्यद सल्लाउद्दीन 1993 ला पळाला, टायगर मेमन 1993 ला पळाला, अनिस इब्राहीम कासकर 1993 ला पळाला, रियाज भटकळ 2007 मध्ये पळाला, इक्बाल भटकर 2019 मध्ये पळाला, मिर्जा सादाब बेग 2009 मध्ये पळाला यांचं सरकार होतं. माझं उत्तर मागितलं. आमच्या सुरक्षा दलाने माझं उत्तर दिलं. आता राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावे.

    2002मध्ये वाजपेयी सरकारने “पोटा” कायदा आणला. त्याला विरोध काँग्रेसने केला. आमच्याकडे बहुमत नव्हतं. पोटा कायदा रोखून काँग्रेस कुणाला वाचवत होते. पोटा तर दहशतवाद्यांच्या विरोधात होता, पोटा रोखून तुम्ही व्होट बँक राखली” अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “2004 मध्ये वाजपेयींचं सरकार गेलं. मनमोहन सिंग यांचं सरकार आलं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी पोटा कायदा रद्द केला. कुणाच्या फायद्यासाठी काँग्रेसने पोटा कायदा रद्द केला? त्याचं उत्तर द्या” अशी मागणी अमित शाह यांनी केली.

     

    2004 च्या डिसेंबरमध्ये पोटा कायदा रद्द झाला. 2005 मध्ये अयोध्येत हल्ला झाला. मुंबईत हल्ला, डोडा उधमपूरमध्ये हिंदूंवर हल्ला, 2007 हैदराबाद स्फोट, यूपी, लखनऊत हल्ला, रामपूर सीआरपीएफ कॅम्प हल्ला, श्रीनगरमध्ये हल्ला, मुंबईत दहशतवादी हल्ला, जयपूरमध्ये हल्ला, अहमदाबादमध्ये 21 हल्ले झाले, दिल्लीत पाच स्फोट झाले, पुण्याच्या जर्मन बेकरीत हल्ला, वाराणासीत हल्ला, पुन्हा मुंबईत तीन स्फोट झाले. दहशतवादाच्या विरोधात लढाई होती. 2005 ते 2011 च्या काळात 27 दहशतवादी हल्ले झाले. हजाराच्यावर लोक मारले गेले. तुम्ही काय केलं?. मी राहुल गांधींना आव्हान दिलं. या दहशतवादी हल्ल्याबाबत यांच्या सरकारने काय केलं ते इथे उभं राहून सांगा. हे इथून पाकिस्तानाला दहशतवाद्यांचे फोटो पाठवत होते. डोजिअर पाठवले.

    मोदी सरकारच्या काळात झालेले हल्ले पाकिस्ताना प्रेरित आणि काश्मीर सेंट्रीक हल्ले झाले. 2014 ते 2025 पर्यंत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. हे नरेंद्र मोदी सरकार आहे. काश्मीरमध्येही आजची स्थिती आहे. पाकिस्तानातून त्यांना अतिरेकी पाठवावे लागत आहेत. आता काश्मीरमध्ये अतिरेकी तयार होत नाहीत.

    • – म्हणे सोनिया गांधी रडल्या

    – मी सलमान खुर्शीद यांना टीव्हीवर रडताना पाहिलं. ते सोनिया गांधींच्या घरातून बाहेर पडले. बाटला हाऊसच्या हल्ल्यामुळे सोनिया गांधी रडल्या. रडयाचं होतं तर शहीद शर्मांसाठी रडायचं होतं. तुम्ही बाटला हाऊसच्या अतिरेक्यांसाठी रडता. तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला विचारण्याचा?

    Amit Shah took stock of the Congress governments in the Lok Sabha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : भारत – अमेरिका संबंध बिघडविण्याचे राहुल गांधी यांचे षडयंत्र अन‌् पंतप्रधानांचा संयम

    ISRO Launches NISAR : इस्रोने सर्वात महागडा व शक्तिशाली उपग्रह NISAR लाँच केला; घनदाट जंगलासह अंधारातही पाहण्याची क्षमता

    Trump’s : राष्ट्रीय हितासाठी सर्व उपाय करणार, भारतावर २५% टॅरिफ लावण्याच्या ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर केंद्र सरकारची ठाम भूमिका