राहुल गांधी यांच्या ‘मोहब्बत की दुकान’ या घोषणेवरूनही निशाणा साधला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी काँग्रेसवर मतपेढीचे राजकारण केल्याचा आरोप केला आणि त्यांच्या कार्यकाळात राज्यघटनेत केलेल्या काही बदलांवर टीका केली. तर अमित शाह म्हणाले की, भाजप सरकारने केलेल्या दुरुस्त्या नागरिकांना सक्षम करण्यासाठी आहेत.Amit Shah
राहुल गांधींचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला की, भाजप संविधान बदलेल असे सांगत ५४ वर्षांचा तरुण फिरत असतो. राज्यघटना बदलण्याची तरतूद घटनेतच आहे, हे त्यांना कळायला हवे. भाजपने १६ वर्षे राज्य केले आणि २२ वेळा संविधान बदलले. काँग्रेसने ५५ वर्षांत ७७ दुरुस्त्या केल्या. बदल करण्याचा उद्देश काय होता? लोकशाही बळकट करण्यासाठी काय केले? की आपली राज्यसत्ता वाचवण्यासाठी केली होती? यावरून पक्षाचे चारित्र्य आणि राज्यघटनेवरचा विश्वास दिसून येतो.
संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यसभेत झालेल्या चर्चेच्या समारोपावर बोलताना अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली की, भाजपला राज्यघटना बदलायची आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या ‘मोहब्बत की दुकान’ या घोषणेवरूनही निशाणा साधला आणि प्रेम आणि आपुलकी ही दुकानात विकता येणारी गोष्ट नाही असे म्हटले. ते म्हणाले की, प्रत्येक गावात ‘प्रेमाची दुकाने’ सुरू करण्याविषयी बोलणाऱ्यांची भाषणेही आम्ही ऐकली आहेत. प्रेम विकायची गोष्ट नाही. ही एक भावना आहे जी हृदयात जागृत झाली पाहिजे, इतरांमध्ये जागृत करण्याचा हा क्षण आहे.
Amit Shah taunt to Rahul Gandhi said 54 year old young
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
- NCP’s lust for power : सत्तेची चटक लावल्याचे बसले चटके; अजितदादांच्या फोटोला पुण्यात मारले जोडे!!
- Deepak Mankar नको ते उद्योग करू नका अन्यथा.. दीपक मानकर यांचा भुजबळ समर्थकांना दम
- धर्माचे एकत्व व्यवहारातून प्रकट व्हावे : डॉ. मोहन भागवत