• Download App
    काळ्या पैशाच्या नोटा मोजताना मशीन्स गरम झाली, तरी काँग्रेससह विरोधक म्हणतात कारवाई नको; अमित शाहांचा घणाघात!! Amit shah targets to congress 

    काळ्या पैशाच्या नोटा मोजताना मशीन्स गरम झाली, तरी काँग्रेससह विरोधक म्हणतात कारवाई नको; अमित शाहांचा घणाघात!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकार काळ्या पैशाविरुद्ध करत असलेल्या कारवाईत त्या पैशाच्या नोटा मोजताना बँकांची मशीन्स गरम झाली, तरी नोटा मोजायच्या संपल्या नाहीत. पण काँग्रेस आणि बाकीचे विरोधक म्हणतात कारवाई करू नका. असे कसे चालेल??, काळा पैसा जमा करणाऱ्यांवर कारवाई तर होणारच!!, अशा खणखणीत शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सर्व विरोधकांवर निशाणा साधला. Amit shah targets to congress

    सीएनएन न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत त्यांना अमित शहा यांना ईडीच्या कारवाई संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्या संदर्भात तपशीलवार माहिती दिली.

    अमित शाह म्हणाले की, ईडी ने आत्तापर्यंत जेवढे पैसे जप्त केले त्यापैकी 95 % रक्कम ही काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या इतर व्यक्तींकडूनच जप्त केली आहे. 5 % रक्कम राजकारणाशी संबंधित व्यक्तींकडून जप्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्र्याकडून 55 कोटी रुपये जप्त केले. त्या नोटा मोजताना 10 मशीन्स गरम होऊन बंद पडली. त्या नोटा भरून बँकांमध्ये न्यायला दोन मॅटाडोअर कराव्या लागल्या. ओडिषात काँग्रेसच्या खासदाराकडून 355 कोटी रुपये जप्त केले.

    एवढे पैसे या मंत्र्याकडे किंवा खासदाराकडे आले कुठून??, या लोकांना पैसे दिले कोणी??, हे सांगण्याची जबाबदारी कोणाची??, राहुल गांधी, ममता बॅनर्जी या सर्वांची उत्तरे देतील का??, असे तिखट सवाल अमित शाह यांनी काँग्रेस सह सर्व विरोधकांना केले. ज्यांनी भ्रष्टाचार केला, काळा पैसा जमा केला, त्यांच्यावर कारवाई होणारच. ती अजिबात थांबणार नाही, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

    Amit shah targets to congress

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार