• Download App
    अमित शाहांचा हैदराबादमध्ये ‘केसीआर’वर थेट निशाणा, म्हणाले ‘’सत्तेतून बेदखल करेपर्यंत…’’Amit Shah takes direct aim at KCR in Hyderabad says Until he is ousted from power

    अमित शाहांचा हैदराबादमध्ये ‘केसीआर’वर थेट निशाणा, म्हणाले ‘’सत्तेतून बेदखल करेपर्यंत…’’

    मुख्यमंत्री केसीआर यांनी काहीही केलं तरी ते तेलंगणातील लोकांना पंतप्रधान मोदींपासून दूर ठेवू शकत नाहीत

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केसीआर सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केसीआर सत्तेतून बाहेर पडेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही, असे ते म्हणाले. तसेच, लोकांचे लक्ष वळवण्यासाठी टीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) चे नाव बदलून बीआरएस (भारत राष्ट्र समिती) करण्यात आले आहे. असेही शाह यांनी यावेळी सांगितले. Amit Shah takes direct aim at KCR in Hyderabad says Until he is ousted from power

    याशिवाय अमित शाह म्हणाले ‘’केसीआर राज्यातील सत्ता गमावणार आहेत आणि पीएम बनण्याबाबत  बोलत आहेत. भाजपा सरकारसाठी जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून अमित शाहा यांनी सांगितले की, “मी तुम्हाला वचन देतो, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार बनवू आणि आम्ही तेलंगणाचा स्वातंत्र्यदिन हैदराबादच्या परेड ग्राउंडवर साजरा करू. आम्ही मजलीसला घाबरत नाही. मजलिस ही केसीआरची मजबूरी आहे, भाजपसाठी नाही. तेलंगणाचे सरकार राज्यातील जनतेसाठी चालेल ते ओवेसींसाठी चालणार नाही.’’

    याचबरोबर अमित शाह म्हणाले की, ‘’तेलंगणचे पोलीस पूर्णपणे राजकीय झाले आहेत. पंतप्रधान मोदी ज्या काही कल्याणकारी योजना राज्यात पाठवतात, त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. मुख्यमंत्री केसीआर यांनी काहीही केलं तरी ते तेलंगणातील लोकांना पंतप्रधान मोदींपासून दूर ठेवू शकत नाहीत.’’ तसेच, “आत्ताच आमच्या संजय कुमार यांना केसीआरने तुरुंगात टाकले. त्यांना वाटते की भाजपा कार्यकर्त्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटते. केसीआर, कानाचे पडदे उघडून इथल्या प्रत्येक कार्यकर्ता काय म्हणतोय ते ऐका. तुमचा अत्याचार आणि गुन्हा सहन करायला आम्ही घाबरत नाही, तुम्हाला सत्तेतून खाली उतरवेपर्यंत आमचा लढा संपणार नाही.’’

    Amit Shah takes direct aim at KCR in Hyderabad says Until he is ousted from power

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य