• Download App
    Amit Shah 'महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेबचा फॅन क्लब'

    Amit Shah : ‘महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेबचा फॅन क्लब’

    Amit Shah

    गृहमंत्री अमित शहांचा विरोधी आघाडीवर हल्लाबोल


    विशेष प्रतिनिधी

    धुळे : Amit Shah  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी महाराष्ट्रातील धुळे येथे एका सभेला संबोधित करताना महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. अमित शहा म्हणाले की, शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील बाळसाहेब ठाकरे यांची तत्त्व विसरले आहेत. तसेच त्यांनी विरोधकांच्या महाविकास आघाडीचे वर्णन औरंगजेब फॅन क्लब असे केले.Amit Shah



    आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले, “उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिर उभारणीला विरोध करणाऱ्या पक्षांशी युती करत आहेत. आघाडीला (महाविकास आघाडी) फक्त तुष्टीकरण हवे आहे. सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे पाठिंबा देत आहेत. उद्धव ठाकरे आज औरंगाबादचे नाव बदलण्याची, राम मंदिराची मागणी करणाऱ्यांच्या पाठिशी बसले आहेत. ज्यांनी कलम 370 हटवण्यास आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास विरोध केला होता.

    ‘आघाडी हा औरंगजेबाचा फॅन क्लब’

    अमित शाह पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेसमोर दोन स्पष्ट बाजू आहेत – आघाडी, जी औरंगजेबाची फॅन क्लब आहे आणि दुसरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांच्या तत्त्वांवर चालणारी महायुती. महायुती म्हणजे विकास आणि महाविकासआघाडीचा अर्थ विनाश. आता तुम्हाला विकास आणणाऱ्यांना सत्तेवर आणायचे की विनाश करणाऱ्यांना हे ठरवायचे आहे.

    Amit Shah said that Maha Vikas Aghadi is Aurangzebs fan club

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी