जाणून घ्या काय आहे नवीन नाव? Amit Shah
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता पोर्ट ब्लेअरला ‘श्री विजयपुरम’ म्हणून ओळखले जाईल. गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे. अमित शाह यांनी सोशल मीडियावर लिहिले ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते.
Bhagyashree Atram : अजित पवार यांनी मला ज्ञान शिकवू नये, भाग्यश्री आत्राम यांनी थेटच सुनावले
त्यांनी पुढे लिहिले की, ‘आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि इतिहासात या बेटाचे अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे.
‘हे बेट म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसजी यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये केलेल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापर्यंतचे ठिकाण आहे.’ Amit Shah