• Download App
    पाकिस्तानी अणुबॉम्बच्या चर्चांदरम्यान अमित शाहांनी 'पीओके'बाबत केलं मोठं विधान! Amit Shah made a big statement about POK during the discussions of Pakistani nuclear bomb

    पाकिस्तानी अणुबॉम्बच्या चर्चांदरम्यान अमित शाहांनी ‘पीओके’बाबत केलं मोठं विधान!

    जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत गृहमंत्री अमित शाह

    विशेष प्रतिनिधी

    खुंटी : झारखंडमधील खुंटी येथे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, आज मणिशंकर अय्यर आम्हाला धमक्या देत आहेत, ते आम्हाला पाकिस्तानचा आदर करण्यास सांगत आहेत कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. अमित शाह म्हणाले की, काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी पीओकेबाबत बोलू नका, कारण पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, असं विधान केलं होतं.

    जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “आज मी INDI आघाडीच्या नेत्यांना सांगू इच्छितो की PoK भारताचे आहे आणि ते कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. PoK भारतात विलीन करण्याबद्दल बोलण्याऐवजी काँग्रेस आम्हाला अण्वस्त्राच्या धमक्या देत आहे. पीओके हा भारताचा भाग आहे हे स्पष्ट आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पाकिस्तानमधून पीओके आणण्याऐवजी काँग्रेस अणुबॉम्बच्या चर्चा करून भारतातील लोकांना घाबरवत आहे. काँग्रेसला काय झाले माहीत नाही. पीओकेमधील प्रत्येक इंच जमीन भारताची आहे आणि ती भारतातच राहिली पाहिजे, अशी भाजपची भूमिका स्पष्ट आहे, असे शाह म्हणाले.

    Amit Shah made a big statement about POK during the discussions of Pakistani nuclear bomb

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!