विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2047 पर्यंत देशाला आत्मनिर्भर भारत बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय आहे पण राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा सोनियांचा डाव आहे, तर आपल्याच मुला-मुलींना मुख्यमंत्री करण्याचा ठाकरे – पवारांचा डाव सुरू आहे, अशा प्रकट शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात घराणेशाही पक्षांवर शरसंधान साधले. Amit Shah lambasted at dynasty politics of Gandhi, pawar, thackeray and others
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशापुढे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षात 2047 पर्यंत देश विविध क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची त्यात अपेक्षा आहे. भाजपमध्ये पक्षाची सूत्रे कोणा एका घराण्याच्या मालकीची नाहीत.
पण या देशात आता अशा अनेक राजकीय पक्ष आहेत की जे टू जी थ्री जी फोर जी आहेत टू जी याचा अर्थ टू जी घोटाळा नव्हे, तर अनेक पक्ष दोन पिढ्या, तीन पिढ्या, चार पिढ्या आपला नेताच बदलत नाहीत. कारण त्या पक्षांमध्ये परिश्रमाला, कष्टाला, गुणवत्तेला आणि कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाला किंमत नाही. तिथे नेत्याच्या पोटी कोण जन्माला आला?? यालाच महत्त्व आहे. आपल्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीला पक्षाचा राजकीय वारसा सोपवण्याची त्यांची पद्धत आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली.
पंतप्रधान मोदींनी एकीकडे 2047 मध्ये विकसित भारत हे ध्येय ठेवले आहे. पण दुसरीकडे घराणेशाही पक्षांचा डाव काय सुरू आहे??, तर सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे. शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जींना आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री करायचे आहे. एम. के. स्टालिन यांना मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. लालूप्रसाद यादव यांना देखील मुलालाच मुख्यमंत्री करायचे आहे. उद्धव ठाकरे देखील मुलगा मुख्यमंत्री होण्याची वाट पाहत आहेत आणि मुलायम सिंग यादव तर स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री पदाची खुर्ची देऊनच निघून गेले, याची आठवण अमित शाह यांनी करून दिली.
घराणेशाही चालवणाऱ्या या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना फक्त स्वतःच्या घराण्याचे कल्याण करायचे आहे आणि जे फक्त स्वतःच्या मुलाबाळांचे आणि घराण्याचेच कल्याण करू शकतात, ते गरिबाचे कल्याण काय करतील??, असा परखड सवाल ही अमित शाह यांनी केला.
Amit Shah lambasted at dynasty politics of Gandhi, pawar, thackeray and others
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना महाअधिवेशनाच्या निमित्ताने कोल्हापूरला मिळाली 634 कोटींच्या विकासकामांची भेट!!
- कमलनाथ मुलासह दिल्लीत, 30 आमदारही भाजपमध्ये जाणे शक्य; काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणारे 13 वे माजी मुख्यमंत्री
- पाकिस्तानच्या निवडणुकीत हेराफेरी, मतदान अधिकाऱ्याचा खुलासा- इम्रान समर्थक अपक्ष उमेदवारांना पराभूत केले
- Nakul Nath Profile: कोण आहेत नकुलनाथ? कसे आले राजकारणात, मोदी लाटेत झाले होते खासदार, आता भाजपमध्ये जाणार?