प्रतिनिधी
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वप्न पाहिलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातला लोकार्पण सोहळा येत्या 20 नोव्हेंबर 2022 रोजी रविवारी आंबेगाव येथे होत असून त्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्या हस्तेच शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातल्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. Amit Shah in Maharashtra on November 20 for the inauguration ceremony of Shiv Srishti
नूतन सृष्टीच..!
शिवचरित्राचा ध्यास उराशी बाळगून, ऊन-वारा-पावसाची तमा न करता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत भटकून, गावागावांत भेटी देऊन शिवचरित्र प्रत्येक माजघरापर्यंत पोहोचावं यासाठी प्रयत्न करणारे बाबासाहेब. कलेची उत्तम जाण असणारे, लेखणी आणि वाणीच्या बाबतीत साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले बाबासाहेब. लहानांत लहान आणि थोरात थोर होऊन कधी खट्याळपणे, तर कधी हिमालयासारखे धीरगंभीर भासणारे बाबासाहेब.
बाबासाहेबांना जाऊन एक वर्ष झाले, पण आयुष्यभर त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न काही अंशी तरी आता पूर्ण होते आहे. आंबेगावची ‘शिवसृष्टी’ आता शिवप्रेमींच्या स्वागतासाठी तयार होत आहे. ‘नूतन सृष्टीच’ निर्माण करणारे तिथले असंख्य हात बाबासाहेबांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी झटतायत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या रविवारी होत आहे.
पण या निमित्ताने अमित शाह यांचा दौरा मात्र राजकीय दृष्टीने देखील गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिला दौरा आहे. ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आणण्यामध्ये अमित शाह यांचा सिंहाचा वाटा असल्याची राजकीय वर्तुळात आधीच चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा 16 महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही येऊ घातल्या आहेत. अमित शाह यांचा 20 नोव्हेंबरचा दौरा राजकीय दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात अमित शाह शिवसृष्टीच्या लोकार्पणाबरोबरच भाजपच्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी खलबते करणारा असून त्यांच्या या दौऱ्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन कोणते परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Amit Shah in Maharashtra on November 20 for the inauguration ceremony of Shiv Srishti.
महत्वाच्या बातम्या
- म्हणे, आफताब एकलकोंडा होता, उघडा डोळे बघा नीट, त्याची “ही” एकलकोंडी!
- मेरा अब्दुल वैसा नही है!!, हिंदू मुली अशा का वागतात?
- बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे – फडणवीस आज हिंदुत्वाचा वारसा कार्यक्रमात सावरकर स्मारकात एकत्र
- आफताब – श्रद्धा लव्ह जिहादवर संताप उसळला असताना मराठी माध्यमांचा व्हिक्टीम कार्ड आणि पॉझिटिव्ह स्टोरीचा फंडा