स्थानिक गुप्तचर यंत्रणांना बळकट करण्याच्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : पुंछमधील दहशतवादी घटनेनंतर आठवडाभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा आढावा बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा बळकट करण्यासाठी पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांच्यात उत्तम समन्वय साधण्यावर बैठकीत चर्चा झाली. Amit Shah held a high-level security review meeting in Jammu and Kashmir
याशिवाय स्थानिक गुप्तचर यंत्रणांना बळकट करण्याच्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. या विशेष बैठकीत गृह सचिव अजय कुमार भल्ला, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका आणि अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी!
पहिला दहशतवादी हल्ला सप्टेंबर 2023 मध्ये अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात झाला होता, जिथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे एक कर्नल, एक मेजर रँक अधिकारी आणि एक पोलीस उपअधीक्षक शहीद झाले होते. यानंतर, 22 डिसेंबर 2023 रोजी, दहशतवाद्यांनी राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला, ज्यामध्ये चार जवान शहीद झाले आणि दोन जखमी झाले.
2023 च्या शेवटच्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये कोकरनाग आणि पूंछ-राजौरी सेक्टरमध्ये दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले. यानंतर संवेदनशील परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
Amit Shah held a high-level security review meeting in Jammu and Kashmir
महत्वाच्या बातम्या
- तीन कोटी मराठे मुंबईत धडकणार; बीडमधील कार्यक्रमात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांची घोषणा
- ‘विधि विधान इंटर्नशिप’मुळे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मोलाचे ज्ञान मिळेल – फडणवीस
- राम मंदिराच्या गर्भगृहासाठी निवडली गेली अरुण योगीराज यांनी साकारलेली सुंदर मूर्ती
- अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार भव्य राम मंदिराची उभारणी, पण बाबरीची आठवण काढून ओवैसींची तरुणांना चिथावणी!!