अनुराग ठाकूरच्या समर्थनार्थ केली प्रचाररॅली
विशेष प्रतिनिधी
हमीरपूर : हिमाचल प्रदेशमध्ये १ जून रोजी लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.Amit Shah held a campaign meeting for Anurag Thakur in Hamirpur constituency of Himachal Pradesh
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. भाजप उमेदवार अनुराग ठाकूर यांच्या समर्थनार्थ त्यांनी हमीरपूरमध्ये जाहीर सभा घेतली. पंतप्रधान मोदींनी काल हिमाचलच्या मंडी आणि नाहानमध्ये सभांना संबोधित केले होते.
रॅलीत बोलताना अमित शाहा म्हणाले की, पीओके भारताचे आहे, ते कायम राहील आणि आम्ही ते घेऊ, हे मी ठामपणे सांगत आहे. तसेच अमित शाहा सभेत म्हणाले की, आज सहाव्या टप्प्याचे मतदान होत आहे. मोदींनी केवळ 5 टप्प्यांत 310 चा टप्पा पार केला आहे. आता सहाव्या-सातव्यात टप्प्यात ४००चा आकडा पार करून मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. ४०० पार करण्याची जबाबदारी सातव्या टप्प्यातील लोकांवर आहे.
राहुल गांधींवर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, राहुल बाबा आणि त्यांची बहीण शिमल्यात सुट्टीसाठी येतात पण ते रामलल्लाच्या अभिषेकला गेले नाहीत. ते गेले नाहीत कारण त्यांना त्यांच्या व्होट बँकेची भीती वाटते.
हमीरपूरच्या सभेत अमित शहा म्हणाले की, तुम्ही दिवा लावून शोधलात तरी अनुराग ठाकूरसारखा खासदार सापडणार नाही. त्यांनी केवळ आपल्या क्षेत्राचीच काळजी घेतली नाही, तर देशभरातील तरुणांना भाजप आणि त्यांच्या विचारधारेशी जोडण्याचे काम केले.
Amit Shah held a campaign meeting for Anurag Thakur in Hamirpur constituency of Himachal Pradesh
महत्वाच्या बातम्या
- भीषण अपघात: वैष्णोदेवीला जाणारी मिनी बस ट्रकला धडकली, एकाच कुटुंबातील सात ठार
- टपाल विभागाची बंपर भरती! ग्रामीण डाक सेवकाच्या तब्बल 40000 जागा लवकरच
- अजितदादांचे अखेर परखड बोल; कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असूदे, कारवाई होणारच!!
- ‘जर जिवंत राहिलो तर…’ भाजपचे फरिदकोटचे उमेदवार हंसराज हंस का झाले भावूक?