केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य
विशेष प्रतिनिधी
आगरतळा : Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले की, ईशान्येकडील उग्रवाद संपला आहे आणि आता ईशान्येकडील राज्यांच्या पोलिसांनी आपला दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे. शाह म्हणाले की, आता पोलिसांनी लोकांना जलद न्याय मिळण्यावर भर दिला पाहिजे. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या (एनईसी) 72 व्या सत्राला संबोधित करताना अमित शाह यांनी ही माहिती दिली.Amit Shah
शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत 20 शांतता करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे, ज्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. या शांतता करारांमुळे 9,000 सशस्त्र उग्रवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
शाह म्हणाले, ‘पोलिसांनी ईशान्येत चार दशके दहशतवादाचा मुकाबला केला. दहशतवाद आता संपुष्टात आला असल्याने, एफआयआर दाखल केल्यानंतर तीन वर्षांत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस दलाने आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.’
गृहमंत्र्यांनी असेही सांगितले की ‘केंद्राने रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी 81,000 कोटी रुपये आणि ईशान्येकडील प्रदेशात रस्ते नेटवर्कसाठी 41,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय केंद्र सरकार या भागात सेंद्रिय शेतीवर भर देत आहे. शाह म्हणाले की, केंद्राने या क्षेत्राला चालना देण्यासाठी नॅशनल ऑरगॅनिक कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना केली आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना (ईशान्येकडील) सेंद्रिय उत्पादनांच्या पॅकेजिंग, विपणन आणि निर्यातीसाठी NOCL सोबत करार करण्यास विनंती करतो.
Amit Shah Extremism seems to be over a change in police approach is coming in the Northeast
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोकाअंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- OP Chautala : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला यांचे निधन; शिक्षक भरती घोटाळ्यात तुरुंगवास, 86व्या वर्षी तिथूनच 10-12 वी उत्तीर्ण
- Mohan bhagwat : शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नव्हे, तर साधक असावी; पुण्यात लोकसेवा ई स्कूलचे उद्घाटन
- Bipin Rawat : देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आलं समोर!