• Download App
    अमित शहा केंद्रीय सहकारमंत्री झाले, राष्ट्रवादीला टोचले, जयंत पाटलांनी पवारांच्या पावलावर पाऊल टाकले...!!|Amit shah become co opration minister, NCP leader jayant patil targets him over banks autonomy

    अमित शहा केंद्रीय सहकारमंत्री झाले, राष्ट्रवादीला टोचले, जयंत पाटलांनी पवारांच्या पावलावर पाऊल टाकले…!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई  : केंद्रात नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविला त्यावरून बाकीच्या पक्षांनी फारशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत.Amit shah become co opration minister, NCP leader jayant patil targets him over banks autonomy

    पण त्यांचे सहकारमंत्री होणे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीला टोचले. महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.



    या बाबतीत जयंत पाटलांनी आपले नेते शरद पवार यांचीच री ओढली आहे. शरद पवारांनी साखर उद्योग, बांधकाम व्यावसायिक, सहकारी बँका याच विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे लिहिली आहेत. हेच विषय जयंत पाटलांनी प्रतिक्रियेत आणले आहेत.

    गुजरात आणि महाराष्ट्रातच सहकार आहे. गुजरातमध्ये अमित शाह एक बँकही चालवत होते. नोटबंदीच्या काळात त्यांच्या एका बँकेचे नाव फार चर्चेत आले होते. जास्त नोटा त्या बँकेत एक्सचेंज झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे सहकाराचा त्यांना अनुभव आहे, अशी टिपण्णी जयंत पाटील यांनी केली आहे.

    त्याचवेळी जयंत पाटील यांनी अमित शाहांना सहकारी बँकांच्या स्वायत्ततेच्या प्रश्नातही लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, की गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यात फारसा फरक नाही. अमित शाह यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल.

    मी त्यांच्या नेमणुकीचे स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधने घातली आहेत. त्यांची स्वायत्तता धोक्यात आलीये. देशातल्या बँकिंग व्यवसायावर अन्याय होतोय तो अमित शाह दूर करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

    Amit shah become co opration minister, NCP leader jayant patil targets him over banks autonomy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य