Friday, 2 May 2025
  • Download App
    अखिलेश जी, यूपीतले गुंडाराज संपलेय, चष्मा बदलून पहा; माँ शाकंभरी विद्यापीठ शिलान्यास समारंभात अमित शहांचा टोला |Amit shah and yogi adityanath given answer to akhilesh yadav over law and order situations in U P

    अखिलेश जी, यूपीतले गुंडाराज संपलेय, चष्मा बदलून पहा; माँ शाकंभरी विद्यापीठ शिलान्यास समारंभात अमित शहांचा टोला

    वृत्तसंस्था

    सहारनपूर : उत्तर प्रदेशात भाजपच्या राजवटीत गुंडगिरी वाढली आहे. राज्यात माफिया राज आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आपल्या समाजवादी विजय यात्रेत वारंवार केली आहे. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सहारनपूर मधून प्रत्युत्तर दिले आहे.Amit shah and yogi adityanath given answer to akhilesh yadav over law and order situations in U P

    “अखिलेश जी, तुम्ही कोणता चष्मा लावून उत्तर प्रदेशाकडे बघता??, उत्तर प्रदेशात तुमच्या राजवटीत गुंड आणि माफियांचे राज्य होते. आता राज्यातली लूटपाट संपली आहे. माफिया जेलमध्ये आहेत. तुम्ही घरी जाऊन चष्मा बदला आणि डाटा नीट तपासा, असा टोला अमित शहा यांनी लगावला आहे.



    सहारनपूर मध्ये माँ शाकंभरी विद्यापीठाच्या शिलान्यास समारंभात ते बोलत होते. श्री शाकंभरी मातेच्या नावाने सहारनपूर मध्ये शैक्षणिक क्रांती घडत आहे. उत्तर प्रदेश विकासाच्या वाटेवर अग्रेसर होत आहे. आधीच्या राजवटीत गुंड आणि माफियाराज संपूर्ण पश्चिमी उत्तर प्रदेशात चालत होते.

    त्यांच्याकडे विकासाचा आणि राष्ट्रवादाचा अजेंडा नव्हता. पण गुंड आणि माफियागिरी मोडून भाजपचा साडेचार वर्षांच्या राजवटीत पश्चिमी उत्तर प्रदेश विकासाच्या वाटेवर आम्ही अग्रेसर केले आहे. माँ शाकंभरी विद्यापीठाचा शिलान्यास समारंभ होणे हे त्याचे द्योतक आहे, असे उद्गार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले.

    अखिलेश यादव यांनी समाजवादी विजय यात्रेत योगी आदित्यनाथ यांच्यावर वारंवार उत्तर प्रदेश मधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून तोफ डागली आहे. उत्तर प्रदेशातले बुल (बैल) आणि बुलडोझर यांची राजवट संपवून समाजवादी राजवट आणायची आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

    आज त्यांच्या सर्व वक्तव्यांचा समाचार अमित शहा आणि योगी आदित्यनाथ या दोघांनी माँ शाकंभरी विद्यापीठाच्या शिलान्यास समारंभाच्या निमित्ताने घेतला आहे. गृह मंत्रालयाची आकडेवारी असे सांगते की उत्तर प्रदेशातली लूटपाट एकूण 60 टक्क्यांनी घटली आहे. माफियागिरी 70 टक्‍क्‍यांनी घटली आहे. महिला सुरक्षा विषयी उपाययोजना देखील काम करताना दिसत आहेत.

    राज्यातल्या महिला सुरक्षिततेचे प्रमाण वाढले आहे. खुद्द महिलांच्या तोंडी देखील आता राज्य सरकार विषयक समाधानाचे उदगार निघत आहेत, याची आठवण अमित शहा यांनी आवर्जून करून दिली आहे. “अखिलेश जी, तुमच्या राजवटीत गुंड आणि माफियागिरी चालू होती.

    महिला सुरक्षित नव्हत्या. त्या रस्त्यावर फिरू शकत नव्हत्या. आज त्या मध्यरात्री देखील सुरक्षित रस्त्यावर फिरू शकतात हे विसरु नका. गुंड आणि माफियांची कोणताही गैरप्रकार करायची हिंमत होत नाही कारण उत्तर प्रदेशात योगींनी कायद्याचा दंडा चालवला आहे, असेही अमित शहा म्हणाले.

    Amit shah and yogi adityanath given answer to akhilesh yadav over law and order situations in U P

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Siren system : भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये वाढली भीती, ‘या’ शहरांमध्ये बसवले सायरन सिस्टीम

    Waves Summit वेव्ह्ज शिखर संमेलनातून भारताच्या सांस्कृतिक अन् सर्जनशील शक्तीचा जागतिक उदय

    Pahalgam attack : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर “गायब”; पण ISI च्या प्रेस रिलीज मध्ये दाखवला रणगाड्यावर उभा!!