• Download App
    पवारांची मानभावी माफी त्यांच्यावरच उलटली; अमरावतीत शाह - फडणवीसांनी सादर केली पवारांच्या चुकांची यादी!! Amit Shah and devendra fadnavis targets sharad pawar over his hypocritical apology

    पवारांची मानभावी माफी त्यांच्यावरच उलटली; अमरावतीत शाह – फडणवीसांनी सादर केली पवारांच्या चुकांची यादी!!

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी अमरावतीत येऊन अत्यंत मानभावी पणाने अमरावती करांची माफी मागितली त्यांनी 2019 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणांना पाठिंबा दिला होता त्या निवडून आल्या पण त्यानंतर त्यांनी लोकसभेत भाजपची बाजू लावून धरली आणि आता त्या भाजपच्या उमेदवार आहेत. पवारांनी नवनीत राणांना पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीच्या जाहीर सभेत मानभावी पणाने माफी मागितली. Amit Shah and devendra fadnavis targets sharad pawar over his hypocritical apology

    पण आता तीच माफी पवारांवर पूर्ण उलटली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या मानभावी माफीचा मुद्दा उचलून अमरावतीच्या सभेत आज त्यांना जोरदार ठोकून काढले पवारांना खरंच माफी मागायची असेल, तर त्यांनी कुणाकुणाची माफी मागितली पाहिजे??, याची यादीच अमित शाह आणि फडणवीस यांनी जाहीर केली.

    अमित शाह म्हणाले :

    पवारांना खरंच माफी मागायची असली, तर त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबांची माफी मागावी. पवार साहेब तुम्ही कृषिमंत्री होतात पण तुमच्या काळातच संपूर्ण देशभर आणि विशेषत: महाराष्ट्रात विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाहीत. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांची माफी मागा.

    – देवेंद्र फडणवीस म्हणाले :

    शरद पवारांना खरंच माफी मागायची असेल, तर त्यांनी विदर्भातल्या सगळ्या जनतेची माफी मागितली पाहिजे. कारण ते खूप वर्षे सत्तेवर राहिले, पण विदर्भाचा विकास त्यांनी केला नाही. विदर्भाला त्यांनी त्यांच्या राजवटीत कायम मागासच ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विदर्भात टेक्स्टाईल पार्क आले, रेल्वे स्टेशनची सौंदर्यीकरणे झाली, नागपुरात मेट्रो आली, रेल्वे विस्तारीकरणाचे काम झाले. ही कामे खरं म्हणजे पवारांच्या आणि काँग्रेसच्या सत्तेच्या काळात व्हायला हवी होती, ती सगळी कामे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली. त्यामुळे पवारांना खरंच माफी मागायची असेल, तर त्यांनी विदर्भातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे. पण पवार तशी माफी मागणार नाहीत कारण त्यांना फक्त मानभावीपणा करायचा आहे.

    Amit Shah and devendra fadnavis targets sharad pawar over his hypocritical apology

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!