प्रतिनिधी
मुंबई : ब्रँड मिलने बंद, टोपी पहनकर पूजा, हिंदू बनने का नाटक शुरू… आमिर खान ट्रोल असे सोशल मीडियावर घडले आहे. आमिर खान नव्या ऑफिसमध्ये शिफ्ट झाल्यानंतर तो आणि त्याची घटस्फोटीत पत्नी किरण राव हिंदू पद्धतीने पूजा पाठ केला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. amir-khan-trolled-for-doing-pooja-with-ex-wife-kiran-rao-see-kareena-kapoor-costar-new-look-aamir-khan
मात्र या फोटोंमुळे आमिर खान ट्रोल देखील होत आहे. आमिर खानने आत्तापर्यंत आपल्या सिनेमांमधून हिंदू पूजा पद्धतीची अनेकदा खिल्ली उडवली आहे. 2014 नंतर आमिर खानची पत्नी किरण राव हिला भारतात राहणे असुरक्षित वाटू लागले होते. दरम्यानच्या काळात आमिर खानचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट लालसिंग चढ्ढा आला आणि फ्लॉप झाला. त्यानंतर आमिर खानने चित्रपटसृष्टी पासून दूर राहायचा निर्णय घेतला.
पण आमिर खानने नुकतेच आपले ऑफिस शिफ्ट केले आहे. तेथे हिंदू पद्धतीने गृहप्रवेश करून काम सुरू केले आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबरोबर अनेक युजर्सनी आमिर खानला ट्रोल केले आहे. लालसिंग चढ्ढा फ्लॉप झाला, त्यामुळे आता ठिकाणावर आला. ब्रँड मिलने बंद, हिंदू बनने का नाटक शुरू, झांसे मे मत आना, असे एका पाठोपाठ एक डायलॉग अनेकांनी सोशल मीडियावर लिहून आमिर खानला अनेकांनी ठणकावले आहे.
आमिर खान आणि त्याच्या बायकोला 2014 नंतर भारतात राहणे असुरक्षित वाटत होते. पण लालसिंग चढ्ढा सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींना आणि त्यांच्या पत्नीला भेटणे असुरक्षित वाटत नव्हते. एर्डोगान हेच ते तुर्कस्तानचे राष्ट्रपती आहेत, ज्यांनी काश्मीर प्रश्न भारत विरोधी भूमिका घेऊन पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्या तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींना आमिर खान आणि त्याची पत्नी भेटले होते, याची आठवण अनेकांनी सोशल मीडियावर करून दिली आहे.
amir-khan-trolled-for-doing-pooja-with-ex-wife-kiran-rao-see-kareena-kapoor-costar-new-look-aamir-khan
महत्वाच्या बातम्या