Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी पाठवलेले एअर इंडियाचे विमान रविवारी संध्याकाळी 129 प्रवाशांसह दिल्लीला पोहोचले आहे. अफगाणिस्तानातून अशा वेळी या प्रवाशांना आणण्यात आले आहे, जेव्हा काबूलवगळता इतर भागा तालिबान्यांच्या ताब्यात आहे. Amid Afghanistan Crisis air india flight carrying 129 passengers from kabul afghanistan lands in delhi
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी पाठवलेले एअर इंडियाचे विमान रविवारी संध्याकाळी 129 प्रवाशांसह दिल्लीला पोहोचले आहे. अफगाणिस्तानातून अशा वेळी या प्रवाशांना आणण्यात आले आहे, जेव्हा काबूलवगळता इतर भागा तालिबान्यांच्या ताब्यात आहे.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एअरलाइन्सची दिल्ली-काबूल-दिल्ली फ्लाईट रद्द करण्याची कोणतीही योजना नाही आणि ती सोमवारीही सुरू होणार आहे. सध्या एअर इंडिया फक्त भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान उड्डाणे चालवत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एअरलाइनने रविवारी दुपारी सुमारे 40 प्रवाशांसह दिल्ली-काबूल विमान (AI-243) चालवले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की एआय -243 फ्लाइटने दिल्लीहून दुपारी 1.45 वाजता (भारतीय वेळेनुसार) उड्डाण केले आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) कडून उतरण्यासाठी परवानगी न मिळाल्याने त्यांना सुमारे एक तास आकाशात काबूल विमानतळाभोवती घिरट्या घालाव्या लागल्या. त्यामुळे रविवारी AI-243चा सामान्य उड्डाण कालावधी एक तास चाळीस मिनिटांऐवजी सुमारे दोन तास पन्नास मिनिटे होता.
ते म्हणाले की, एआय -243 ला उतरण्यास परवानगी मिळण्यास विलंब होण्याचे कारण काय आहे हे स्पष्ट नाही. 129 प्रवाशांसह परतीचे विमान AI-244 (भारतीय वेळेनुसार) संध्याकाळी 5.35च्या सुमारास काबूल विमानतळावरून निघाले. ते म्हणाले की, विमान कंपनी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ती कारवाई करेल.
अफगाणिस्तानच्या राजधानी बाहेरील भागात तालिबानी फौजा घुसल्याच्या बातम्यांनंतर भारताने रविवारी भीती आणि शंकेने घेरलेल्या आपल्या शेकडो अधिकारी आणि नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्याची आकस्मिक योजना बनवली. या प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या लोकांनी सांगितले की, सरकार काबूलमधील भारतीय दूतावास आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकणार नाही. इमर्जन्सी रेस्क्यू प्लॅन आधीच आखण्यात आला होता.
Amid Afghanistan Crisis air india flight carrying 129 passengers from kabul afghanistan lands in delhi
महत्त्वाच्या बातम्या
- Taliban Income : जाणून घ्या तालिबानचे उत्पन्न किती, कोण पुरवतो शस्त्रे, कसा गोळा होतो पैसा, वाचा सविस्तर..
- मुख्यमंत्री मरू द्या म्हणणाऱ्या भरणेंना तानाजी सावंत यांचा इशारा; औकातीत राहा, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादानेच तुम्ही सत्तेत!
- Afghanistan Crisis : तालिबानपुढे सरकारने गुडघे टेकले, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींनी अफगाणिस्तान सोडून काढला पळ
- सरसंघचालकांचे 35 पेक्षा जास्त देशांतील 10 लाखांहून अधिक तरुणांना संबोधन, भारतात सर्व विविधता स्वीकारल्या जात असल्याचे प्रतिपादन
- अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर काय म्हणाली नोबेल विजेती मलाला युसूफझाई, वाचा सविस्तर तिची प्रतिक्रया…