नाशिक : ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली??, ती कुणी केली??, याच्या बातम्या देताना अमेरिकन प्रेस विशेषत: न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN यांनी भारत विरोधी नॅरेटिव्ह पसरवले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुबॉम्बचे युद्ध भडकण्याची शक्यता किंबहुना “गुप्त माहिती” अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. पाकिस्तानी लष्करामधल्या कट्टरतावादी शक्ती एकतर भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरतील किंवा पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडतील, असे जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याच्या बातम्या CNN आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी गुप्ताचरांच्या हवाल्याने दिल्या. यातून भारत घाबरल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे नेहमीप्रमाणे सूचित केले. पण पाकिस्तानशी फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताला परत करण्याविषयी बोला, असे मोदींनी जे. डी. व्हान्स यांना सुनावले, याची बातमी मात्र न्यूयॉर्क टाइम्स किंवा CNN यांनी चालविली नाही.American press ahead in spreading fack news about ceasefire
Operation Sindoor भारताचे पाकिस्तान वरचे हल्ले प्रिसिजन आणि प्रोफेशनल होते. भारताने ब्राह्मोस सारखी सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे वापरून पाकिस्तानातल्या बहावलपूर, मुरिदके आणि मुजफ्फराबाद इथली “अतिसंरक्षित” दहशतवादी केंद्रे उडवली. नूर खान एअर बेस उडवला. त्या पाठोपाठ अन्य 6 हवाई दलांचे तेवढेच नुकसान केले. त्यानंतर भारताचे टार्गेट पाकिस्तानची अणवस्त्र केंद्रेच राहिली असती, याची भीती पाकिस्तानी लष्करात आणि गुप्तहेर संघटना ISI मध्ये पसरली म्हणून ISI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेशी संपर्क साधून भारताला शस्त्रसंधी करायची गळ घालायची विनंती केली. त्यानंतर अमेरिकेतून सगळी राजनैतिक चक्रे फिरली, ही वस्तुस्थिती समोर आली पण अमेरिकन प्रेसने ही वस्तुस्थिती एक तर दडपून टाकली किंवा tone down करून सांगितली. त्या उलट भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र संघर्ष उडू शकतो, या भीतीपोटी शस्त्रसंधी झाल्याचे narrative पसरविले.
– भारताचे हल्ले “प्रिसिजन आणि प्रोफेशनल”
भारताने सर्जिकल किंवा एअर स्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानात सीमेलगत असलेल्या दहशतवादी केंद्रांचे उच्चाटन केले होते. परंतु यावेळी सीमेपलीकडे तब्बल 100 किलोमीटर पेक्षा आत मध्ये घुसून भारतीय सैन्य दलाने “प्रिसिजन अँड प्रोफेशनल” कारवाई केली. भारताच्या आणि पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र वापरात कमालीची तफावत राहिली. पाकिस्तानने केलेले प्रत्येक ड्रोन अथवा मिसाईल हल्ले भारतीय हवाई संरक्षक यंत्रणेने अर्थात एअर डिफेन्स सिस्टीमने हाणून पाडले. परंतु, भारताच्या सुपरसॉनिक मिसाईल्सच्या हल्ल्यांना पाकिस्तानला भेदता आले नाही. त्यामुळे पाकिस्तानातल्या 7 हवाई तळांचे अपरिमित नुकसान झाले. रहीम यार खान हवाई तळ पुढचा आठवडाभर बंद राहील, हे पाकिस्तानला जाहीर करावे लागले. यातले कुठलेही रिपोर्टिंग अमेरिकन प्रेसने एक तर केले नाही किंवा जे रिपोर्टिंग केले, ते आपल्या सोयीने आणि अमेरिकन narrative ला suit होईल, असेच केले. त्यातही न्यूयॉर्क टाइम्सने भारत विरोधी भूमिका कायम ठेवली.
– रावळपिंडीला धडक
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आजच्या वक्तव्यातून आणखी वेगळी वस्तुस्थिती समोर आली. भारताच्या सैनिकी कारवाईची धमक आणि धडक रावळपिंडीपर्यंत पोहोचली होती. याचा अर्थ भारताने पाकिस्तानच्या सैन्यदल मुख्यालयापर्यंत झेप घेतली होती, हे राजनाथ सिंह यांनी उघडपणे सांगितले. परंतु अमेरिकन प्रेसने या संदर्भात अवाक्षर देखील काढले नाही किंवा त्याचे रिपोर्टिंग केले नाही.
American press ahead in spreading fack news about ceasefire
महत्वाच्या बातम्या
- भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा
- ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी
- कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!
- Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!