• Download App
    American capitalists universities barks against Indian capitalism याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद

    याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!

    नाशिक : याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!, असला प्रकार अमेरिकेतल्या दोन नामवंत विद्यापीठांमधून समोर आलाय. एकीकडे अमेरिकेतले ट्रम्प प्रशासन भारताविरुद्ध अतिरेकी भूमिका घेऊन भारतावर ट्रम्प टेरिफ लादलेय. टेरिफच्या लढाईत भारत अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिलेय. पण त्याचवेळी अमेरिकेतल्या दोन विद्यापीठांमध्ये भारतातल्या भांडवलशाही विरोधात fake narrative पसरविणाऱ्या कार्यशाळा आयोजित केल्या जाताहेत. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी बर्कले विद्यापीठाच्या स्टीफन सेंटर मध्ये ही कार्यशाळा आयोजित केली आहे.American capitalists universities barks against Indian capitalism

    अमेरिकेतल्या बर्कले विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ या दोन नामवंत संस्थांनी दक्षिण आशियातल्या विशेषतः भारतातल्या भांडवलशाही संदर्भात दोन दिवसांचे वर्कशॉप आयोजित केले आहे. या वर्कशॉप मध्ये भारतातल्या विशिष्ट भांडवलशाही प्रवृत्तीने निर्माण केलेल्या वर्चस्ववादी राजवटीवर आणि तिच्या परिणामांवर चर्चा करण्यात येणार आहे. अनेक विद्यापीठीय विद्वान या दोन दिवसांच्या वर्कशॉप मध्ये विद्वत्तापूर्ण पेपर्स सादर करणार आहेत. वरवर पाहता ही विद्यापीठ स्तरावरची अति उच्च बौद्धिक चर्चा आहे, पण त्या चर्चेचे पोस्टर अशा पद्धतीने सोशल मीडियावर फिरविण्यात आले आहे, की त्यामुळे दोन्ही विद्यापीठांचा यातला विध्वंसक सुप्त हेतू समोर आला आहे.



     

    – पोस्टर मधली चालबाजी

    या पोस्टरमध्ये अशी काही चित्रे काढण्यात आली आहेत, ज्यांचा संबंध थेट अदानी + अंबानी + मोदी + शाह + योगी यांच्याशी जोडला जातोय. प्रचंड भांडवलाच्या जोरावर अदानी आणि अंबानी विशिष्ट राजवट निर्माण करणार, मोदी + शाह आणि योगी लोकांना मूर्ख बनवणार, भारतीय सैन्य लोकांना शूट करणार आणि या सगळ्याचे दुष्परिणाम भारतातले शेतकरी गरीब अल्पसंख्यांक भोगणार अशा स्वरूपाचे एकत्रित चित्र या पोस्टर द्वारे निर्माण करण्यात आले आहे. हीच खऱ्या अर्थाने चालबाजी आहे. कारण या सगळ्याला अत्यंत उच्च दर्जाच्या बौद्धिक चर्चेचा मुलामा देण्यात आला आहे. अमेरिकेतली नामवंत बर्कले विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ ही या सगळ्या कार्यशाळेची आयोजक आहेत. त्याला मुंबई आयआयटीची साथ असल्याचे पोस्टर मधून दिसते.

    – मुंबई आयआयटीची माघार

    परंतु संबंधित वर्कशॉपचे पोस्टर जारी झाल्याबरोबर भारतामध्ये त्याच्या प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या. त्या पाठोपाठ मुंबई आयआयटीने संबंधित वर्कशॉप मधून आपले अंग काढून घेतल्याचे पत्रक काढले. पण त्या पलीकडे जाऊन आणखी एक सत्य या निमित्ताने उघड झाले, ते म्हणजे, संबंधित वर्कशॉपला चौधरी सेंटर फॉर बांगलादेश स्टडी या संस्थेने देखील स्पॉन्सर केले आहे.

    – अमेरिकेची दांभिकता उघड्यावर

    या सगळ्या अतिचालबाजीतून अमेरिकेसारख्या देशाची दांभिकता देखील समोर आली. एकतर अमेरिका स्वतःच super capitalist देश. त्या देशाने सगळ्या जगात आपल्या भांडवलशाहीच्या जोरावर धुमाकूळ घडवलाय, पण त्याच देशात अति बौद्धिक चर्चा कशाची घडवून आणली जात आहे, तर ती भारतातल्या विशिष्ट भांडवलशाहीवर आणि तिने निर्माण केलेल्या तथाकथित अन्यायी राजवटीवर!! या चर्चेला फुस कोणाची आहे तर, ती बर्कले विद्यापीठ किंवा मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ यांची. पण याच विद्यापीठांमध्ये किंवा अमेरिकेतल्या अन्य विद्यापीठांमध्ये ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेले टेरिफ या गंभीर विषयावर अद्याप कुठली बौद्धिक चर्चा किंवा वर्कशॉप ठेवलेले आढळलेले नाही.

    American capitalists universities barks against Indian capitalism

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mehul Choksi : मेहुल चोक्सीसाठी आर्थर रोड कारागृहात बराक सज्ज, दोन सेलमध्ये अटॅच बाथरूमसह टीव्ही-पंखे; भारताने बेल्जियमला ​​पाठवले फोटो

    Jairam Ramesh : जयराम म्हणाले – ट्रम्प यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडे दुर्लक्ष केले; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 5 दिवसांत 3 वेळा रशियन तेल खरेदीचा मुद्दा उपस्थित केला

    Guruvayur Temple : केरळमधील गुरुवायूर मंदिराच्या तिजोरीत हेराफेरी; सोन्याच्या ऐवजी चांदीचा मुकुट, चांदीच्या भांड्याचे वजन 1.19 किलोने कमी