• Download App
    मणिपूरमध्ये घात लावून हल्ला, स्पेशल फोर्सच्या जवानासह दोन ठार, कांगपोकपी जिल्ह्यात 'बंद'ची हाक|Ambush in Manipur, Special Force jawan two killed, 'Bandh' called in Kangpokpi district

    मणिपूरमध्ये घात लावून हल्ला, स्पेशल फोर्सच्या जवानासह दोन ठार, कांगपोकपी जिल्ह्यात ‘बंद’ची हाक

    वृत्तसंस्था

    इंफाळ : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय राखीव बटालियनचा (IRB) एक जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. लिमाखॉंग मिशन वेंग गावातील हेनमिनलेन वाफेई (IRB) आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील हुंखो कुकी गावातील थांगमिनलून हँगिंग अशी मृतांची नावे आहेत.Ambush in Manipur, Special Force jawan two killed, ‘Bandh’ called in Kangpokpi district

    हरोथेल आणि कोबशा गावांदरम्यान हा हल्ला झाला. आयआरबीचे जवान आणि चालक मारुती जिप्सीमधून प्रवास करत होते, त्याचवेळी गोळीबार सुरू झाला. या हल्ल्यात हेनमिनलेन वायफेई आणि थांगमिनलून हँगसिंग गंभीर जखमी झाले. पुढे दोघांचाही मृत्यू झाला.



    एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हल्ल्यानंतर परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी शोध सुरू आहे.

    दरम्यान, कुकी-जो समुदायाच्या लोकांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा एका आदिवासी संघटनेने केला आहे. कांगपोकपी जिल्ह्यात ‘बंद’ घोषित करण्यात आला आहे. कांगपोकपी येथील कमिटी ऑफ ट्रायबल युनिटी (COTU) ने स्थानिक लोकांना ‘बंद’मध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील आदिवासींसाठी स्वतंत्र प्रशासनाची व्यवस्था करावी, अशी मागणी कोटूने बैठकीत केली.

    6 महिन्यांपासून जळत आहे मणिपूर

    3 मे रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर (ATSUM) ने ‘आदिवासी एकता मार्च’ काढला. चुराचंदपूरच्या तोरबांग भागात ही रॅली काढण्यात आली. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. या रॅलीदरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसक हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. संध्याकाळपर्यंत परिस्थिती इतकी बिघडली की, तेथे लष्कर आणि निमलष्करी दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या.

    Ambush in Manipur, Special Force jawan two killed, ‘Bandh’ called in Kangpokpi district

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची