विशेष प्रतिनिधी
पुणे : ई कॉमर्समधील प्रमुख कंपनी अमेझोनने पुणे व मुंबई येथे मोठी गोदामे घेतली आहेत. तसेच मुंबईतील गोदामांचा विस्तार केला आहे. अमेझॉन कंपनीने महाराष्ट्रामध्ये एकूण दहा गोदामे उघडली आहेत. नऊ दशलक्ष क्युबिक फूट इतकी यांची क्षमता आहे. वराळे या गावात नवीन गोदाम ऊघडले आहे, जे ‘ पूर्तता केंद्र ‘ आहे. (Fulfillment center).
Amazon’s new step to open new warehouses in Mumbai and Pune
अमेझॉनची राज्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आहे, असे अमेझॉनचा प्रवक्ता म्हणाला. सदर केंद्र ही MSME ना लघुउद्योजक, मध्यम उद्योग, व व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सहाय्यक ठरतील.
गूगल आणि जिओने भारतातील स्मार्टफोन लॉन्च करण्यास केला विलंब
अमेझॉनच्या वितरण व्यवस्थेतील ही सेंटर्स प्रमुख भाग आहेत. सात सॉर्टिंग सेंटर तसेच वितरण सेवा पार्टनर स्टेशन आणि दुकाने ग्राहकांना उत्तम व तत्पर सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. प्रवक्ता म्हणाला की, “अमेझॉनने या सणासुदीच्या काळात १.१० लाख नवीन रोजगार संधी उपलब्ध केल्या आहेत. प्रवक्ता पुढे म्हणाला की, याच महिन्यात करिअर डे दिवशी अमेझॉन कंपनीने ८००० नवीन रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.”
Amazon’s new step to open new warehouses in Mumbai and Pune
महत्त्वाच्या बातम्या
- देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांचा अमेरिकेला विनाथांबा थेट प्रवास
- CYCLONE GULAB : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! चक्रीवादळ गुलाबमुळे भारतीय रेल्वेने 27 सप्टेंबरपर्यंत अनेक गाड्या केल्या रद्द ; पाहा संपूर्ण यादी…
- एअरबस कडून भारत ५६ लष्करी वाहतूक विमाने खरेदी करणार, तब्बल २० हजार कोटींचा करार
- विमानतळावरून मुंबई-पुणे टॅक्सी प्रवासात आता १०० रुपयांची वाढ