• Download App
    अमर्त्य सेन यांनीच घेतला भारतरत्नचा अर्थलाभ, चार वर्षांत २१ वेळा मोफत विमानप्रवास, माहिती अधिकारात झाले उघड|Amartya Sen takes Bharat Ratna benefits, free flights 21 times in four years, RTI reveals

    अमर्त्य सेन यांनीच घेतला भारतरत्नचा अर्थलाभ, चार वर्षांत २१ वेळा मोफत विमानप्रवास, माहिती अधिकारात झाले उघड

    देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनीच केवळ भारतरत्नचा अर्थलाभ घेतल्याचे माहिती अधिकार कायद्यात उघड झाले आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी २१ वेळा मोफत विमानप्रवास केला असल्याचे दिसून आले आहे.Amartya Sen takes Bharat Ratna benefits, free flights 21 times in four years, RTI reveals


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनीच केवळ भारतरत्नचा अर्थलाभ घेतल्याचे माहिती अधिकार कायद्यात उघड झाले आहे.

    गेल्या चार वर्षांत त्यांनी २१ वेळा मोफत विमानप्रवास केला असल्याचे दिसून आले आहे.भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या प्रत्येक मान्यवराला जन्मभर बिझनेस क्लासमधून मोफत विमानप्रवासाची सुविधा मिळते.



    या सुविधेचा लाभ आत्तापर्यंत कोणी घेतला आणि त्यामध्ये सरकारचा किती निधी खर्च झाला याबद्दल माहिती इंडिया टूडे या वाहिनीने माहिती अधिकारात मागितली होती. त्यामध्ये म्हटले आहे की,

    आत्तापर्यंत अमर्त्य सेन वगळता एकाही मान्यवराने या सुविधेचा फायदा घेतलेला नाही. अमर्त्य सेन यांनी चार वर्षांत २१ वेळा मोफत विमान प्रवास केला आहे. एअर इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे.

    अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना २००३ साली भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या मान्यवराला मोफत विमानप्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. आपल्या क्षेत्रात या मान्यवरांनी केलेल्या कामगिरीचा सन्मान म्हणून ही सुविधा देण्यात आली.

    एअर इंडियाच्या माहितीप्रमाणे २०१५ ते २०१९ य काळात सेन यांनी २१ वेळा विमान प्रवास केला. मात्र, त्यासाठीचे किती भाडे सरकारला भरावे लागले याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

    आत्तापर्यंत भारतात ४८ मान्यवरांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यातील १४ जणांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे. बाकी ३४ लोकांपैकी सध्या तीनच जण हयात आहेत.

    त्यामध्ये ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ सीएआर राव यांचा समावेश आहे. मात्र, या तिघांनीही आत्तापर्यंत एकदाही मोफत विमान प्रवासाचा लाभ घेतला नाही.

    Amartya Sen takes Bharat Ratna benefits, free flights 21 times in four years, RTI reveals

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!