विशेष प्रतिनिधी
गोरखपूर : उत्तर प्रदेश गोरखपूर येथे बोलताना काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. त्याचप्रमाणे आपली आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत बोलताना एक विधान देखील केले आहे. दिवंगत इंदिरा गांधी यांची आजच्या दिवशी 31 ऑक्टोबर 1984 साली हत्या करण्यात आली होती.
Although Indira Gandhi knew she could be assassinated …; Priyanka Gandhi’s big statement
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बद्दल सांगताना प्रियांका गांधी म्हणतात, माझ्या आजीला माहीत होतं की त्यांची हत्या होणार आहे. आजच्या दिवशी तेव्हा माझा भाऊ आणि मी शाळेत जात होतो, नेहमी प्रमाणे आम्ही आजीला भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी माझ्या भावाला सांगते होते की, बेटा मला काही झाले तर रडायचे नाही. त्यांना माहीत होते की, त्यांची हत्या होऊ शकते. तरीही त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्यासाठी तुमच्या विश्वासाला पेक्षा जास्त काहीही नव्हते. त्यांच्या हृदयात भारताबद्दल विश्वास होता. आज मी तुमच्यासमोर उभी आहे ही त्यांचीच शिकवण आहे. आणि मीदेखील तुमचा विश्वास कधीही तोडू शकणार नाही. असे प्रियांका गांधी यांनी सभेत बोलताना म्हटले आहे.
लखीमपूर खेरी मधील शेतकर्यांच्या हत्येबद्दल बोलताना त्या म्हणतात की, शेतकऱ्यांची व्यथा कुणीही ऐकली नाही आणि हीच या योगी सरकारची वास्तविकता आहे. शेतकऱ्यांची व्यथा ऐकायला इथे कोणीही नाही. याबद्दल खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
इंदिरा गांधी यांच्या डेथ अॅनिव्हर्सरी निमित्त राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या आजीच्या आठवणीमध्ये ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर केल्या आहेत. राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या फ्युनेरल दिवशीचा आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर प्रियंका गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्यासोबत एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Although Indira Gandhi knew she could be assassinated …; Priyanka Gandhi’s big statement
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द