आलियाला हा पुरस्कार तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
‘विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल देशभरातील अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला. 2021 या वर्षासाठी अनेक स्टार्सनी अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पुरस्कार पटकावले आहेत. Allu Arjun Alia Bhatt won the National Award
दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित या सोहळ्यात आलिया भट्ट, क्रिती सॅनन, अल्लू अर्जुन, पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी, आर माधवन यांच्यासह अनेक कलाकारांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आलियाला हा पुरस्कार तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी देण्यात आला आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे चाहते आलियाचे अभिनंदन करत आहेत. तिचा पती आणि अभिनेता रणबीर कपूरही या तिला पाठिंबा देण्यासाठी आला होता. पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर पोहोचलेल्या आलियाचा फोटो क्लिक करताना रणबीर दिसला. अभिनेत्री क्रिती सेननलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. क्रितीला हा पुरस्कार तिच्या ‘मिमी’ चित्रपटासाठी मिळाला आहे.
‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटासाठी साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. साउथ इंडस्ट्रीच्या संपूर्ण ६९ वर्षांमध्ये अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. हा एक ऐतिहासिक क्षण होता. अभिनेता आर माधवनला त्याच्या ‘रॉकेट्री नंबू इफेक्ट्स’या चित्रपटासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यासाठी चित्रपट निर्माते वर्गीस मुलान आणि अभिनेते आर. माधवनला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्काराने गौरविण्यात आले. माधवनने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.
Allu Arjun Alia Bhatt won the National Award
महत्वाच्या बातम्या
- एकीकडे मोदी सरकार इस्रायलच्या पाठीशी; दुसरीकडे मणिशंकर अय्यरसह काँग्रेसी – डावे – समाजवादी खासदार पॅलेस्टिनी दूतावासात!!
- पुण्यातील नवले पुलावर कंटेनरला धडकल्याने ट्रकने घेतला पेट, चार जणांचा होरपळून मृत्यू
- Income Tax Raid : चार दिवसांत १ अब्ज रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त, ९४ कोटी रुपयांची रोकड जप्त
- Rajasthan Election : भाजपाने उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, ‘या’ सात खासदारांना मिळाले तिकीट!