विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Modi 3.0 अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सलग तिसऱ्या मंत्रिमंडळात प्रमुख मंत्री असलेले राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांच्याकडे 2019 मध्ये सोपविलेलीच खाती पुन्हा सोपविली आहेत. राजनाथ सिंह संरक्षण, अमित शाह गृह आणि नितीन गडकरी, रस्ते बांधणी मंत्री झाले आहेत. सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे जुनेच परराष्ट्र खाते सोपविण्यात आले आहे, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आरोग्य मंत्रालयात परतले आहेत.
पण शिवराज सिंह चौहान नवे कृषिमंत्री तर मनोहर लाल खट्टर नवे उर्जा मंत्री झाले आहेत. अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा रेल्वे खातेच सोपविले आहे, तसेच निर्मला सीतारामन यांना पुन्हा अर्थमंत्री केले आहे.
ज्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर मोदी सरकारची 2022 नंतर किरकिरी झाली होती त्यावेळी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अर्थातच कृषी मंत्रालय देशाच्या केंद्रस्थानी आले होते शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतले होते. नंतर नरेंद्र सिंह तोमर यांना मंत्रिमंडळातून बाजूला करून त्यांचे मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्षपदी पुनर्वसन करण्यात आले. तेव्हापासून मोदी सरकार मधल्या कृषी मंत्रालयाला स्वतंत्र मंत्रीच नव्हते. शिवराज सिंह चौहान यांच्या रूपाने आता नवे कृषिमंत्री कार्यभार हाती घेणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे ग्रामीण विकास खातेही असणार आहे तर मनोहर लाल खट्टर यांच्याकडे ऊर्जा खात्याबरोबरच शहरी विकास खाते असणार आहे.
हरदीप सिंह पुरी यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय सोपविले असून गुजरात मधले नेते सी. आर. पाटील यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाचा तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जुनाच शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपविला आहे. चिराग पासवान यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा तर एचडी कुमार स्वामी यांच्याकडे पोलाद मंत्रालयाचा कारभार सोपविला आहे.
तेलगू देशम पक्षाचे नेते किंजरापू राममोहन नायडू नवे नागरी हवाई वाहतूक मंत्री असतील, तर गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. किरण रिजीजू संसदीय कार्यमंत्री, तर अन्नपूर्णा देवी महिला आणि बालकल्याण मंत्री असतील. रवनीत सिंग बिट्टू यांच्याकडे अल्पसंख्यांक मंत्रालयाचा कार्यभार सोपविला आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे पुनर्निर्मित ऊर्जा आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाचा कारभार सोपविला आहे.
Allotment of department announced to ministers in Modi government
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा झाले भारताचे पंतप्रधान!
- सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत मोदींची नेहरूंच्या रेकॉर्डशी बरोबरी; नड्डा, शिवराज, मनोहरलाल यांच्या मंत्रिपदी शपथविधीने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची उत्सुकता वाढली!!
- Modi 3.0 : माध्यमांमधली पतंगबाजी सोडून सरकार नेमके काय आणि कसे बदलेल??, आर्थिक, सामाजिक अजेंडा कसा असेल??
- मणिपूरमध्ये वृद्धांच्या हत्येमुळे पुन्हा उसळला हिंसाचार; जिरीबाममधील 200 मैतेईंनी घरे सोडली