अतिक अहमदच्या राज्य प्रायोजित हत्येच्या आरोपांवरही दिली प्रतिक्रिया
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गँगस्टर मुख्तार अन्सारी यांचा मृत्यू स्लो पॉयझनिंगमुळे झाल्याच्या कुटुंबीयांच्या आरोपांना संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, ‘हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.’ नेटवर्क18 चे ग्रुप एडिटर-इन-चीफ एक्सक्लुझिव्हमध्ये राजनाथ सिंह म्हणाले की, ‘मुख्तार अन्सारीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अहवाल येईल.’ विष प्रयोगाच्या आरोपांवर ते म्हणाले, ‘असे होऊ शकत नाही. हे सर्व आरोप निराधार आहेत.Allegations of using poison on Mukhtar Ansari are baseless investigation will be started and report will be submitted Rajnath Singh
- कुख्यात माफिया मुख्तार अन्सारीच्या मृत्यूमुळे पाकिस्तानला पोटदुखी, सीएम योगींवर पाक मीडियाचे दोषारोप
अतिक अहमदच्या राज्य प्रायोजित हत्येच्या आरोपांवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हे टोळीयुद्ध आहे. ते एकमेकांना मारतात. हे राज्य प्रायोजित असू शकत नाही. योगी आदित्यनाथ चांगले सरकार चालवत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली आहे. राज्यात यापूर्वी कधीही इतके चांगले वातावरण नव्हते.
दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीमध्ये भाजपची कामगिरी काय असेल यावर ते म्हणाले की, यावेळी पक्ष राज्यातील 80 पैकी 80 जागा जिंकेल. ते पुढे म्हणाले की, यावेळी गांधी परिवाराने नाही तर रॉबर्ट वाड्रा यांनी अमेठी आणि रायबरेलीमधून लढावे. आमचा उमेदवार खूप मजबूत आहे.
Allegations of using poison on Mukhtar Ansari are baseless investigation will be started and report will be submitted Rajnath Singh
महत्वाच्या बातम्या
- आपने नव्या वादाला फोडले तोंड, भगतसिंग-आंबेडकरांसोबत केजरीवालांचा फोटो, भाजपने घेतला आक्षेप
- मिशन 400 च्या नाहीत नुसत्याच गप्पा; भाजपने वाढविला तरी कसा मुस्लिम मतांचा टक्का??; वाचा सविस्तर!!
- लडाखमध्ये ‘इमर्जन्सी लँडिंग’ दरम्यान IAFच्या अपाचे हेलिकॉप्टरला अपघात
- लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निकाल राखून ठेवला