वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात त्यांचेच माजी सहकारी असलेल्या कुमार विश्वास यांनी जे गंभीर आरोप केले होते, त्याची दखल दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. या आरोपांचा संदर्भातच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी अमित शहा यांना पत्र पाठविले होते. या पत्राचे उत्तर अमित शहा यांनी चरणजीत सिंग चन्नी यांना पाठवले आहे. आपण स्वतः या गंभीर आरोपांबाबत चौकशी आणि तपासात लक्ष घालतो आहोत, असे आश्वासन अमित शहा यांनी त्यांना दिले आहे.
Allegations against Aam Aadmi Party are serious
पंजाब मध्ये सामाजिक फूट पाडून आपण पंजाबचे मुख्यमंत्री होऊ किंवा स्वतंत्र खलिस्तानचे पहिले पंतप्रधान तरी होऊ, असे विधान अरविंद केजरीवाल यांनी आपल्याशी बोलताना केले होते, असा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे. हा आरोप अत्यंत गंभीर असून तो थेट देशाच्या एकात्मतेची संबंधित आहे. या बाबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
पंजाब मध्ये आम आदमी पार्टी ही प्रतिबंधित संघटना “सिख फॉर जस्टिस” या संघटनेशी संधान साधून असल्याचा आरोप चरणजीत सिंग चन्नी यांनी केला होता. या आरोपांची केंद्रीय तपास संस्थांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. चरणजीत सिंग चन्नी यांच्या पत्राला उत्तर देऊन अमित शहा यांनी या गंभीर बाबीकडे आपले लक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात त्यांनी या पत्रात आम आदमी पार्टीचे थेट नाव घेतलेले नाही तरीदेखील त्यांचा रोग कशावर आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.
पंजाब मध्ये 20 फेब्रुवारी रोजी मतदान आहे राज्यातला प्रचार आज संपुष्टात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र उत्तर पाठवणे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.
Allegations against Aam Aadmi Party are serious
महत्त्वाच्या बातम्या
- कोर्लई गावात शिवसैनिक – भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने ; खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांची रश्मी ठाकरेंशीही गद्दारी!!; सोमय्यांचा नवा आरोप
- शिवसेना नेतृत्वाचा भाजपशी पंगा; शिवसैनिकांची राष्ट्रवादीशी झुंज…!!
- FARHAN WEDS SHIBANI : मराठमोळ्या पद्धतीने होणार फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचं लग्न ; खंडाळ्यात रंगणार सोहळा
- शिवजयंती मिरवणूक यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द