वृत्तसंस्था
लखनौ : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर जमीन गैरव्यवहाराचे आरोप चुकीचे असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत दैनिक भास्करने ११ पॉइंटमधून झालेले व्यवहार मांडून ट्रस्ट निर्दोष असल्याचे स्पष्ट केले आहे. Allegation of land misappropriation against Ram Mandir Trust is false, purchase of land from SP leaders for Rs 2 crore
ट्रस्टवर ज्या जमिनीवरून आरोप होत आहेत. ती जमीन समाजवादी पक्षाचे नेते सुल्तान अन्सारी यांनी २०११ मध्ये १०० बिस्वा जमीन (सुमारे 3 एकर) दोन कोटी रुपयांना खरेदी केली होती सुल्तानने स्वतः च ती जमीन राम मंदिर ट्रस्टला ती १८.५ कोटी रुपयांना विकली होती. त्यामुळे २ कोटी रुपयांची जमीन एकदम १८.५ कोटीची कशी काय झाली ? या म्हणण्याला अर्थच उरतच नाही.
विशेष म्हणजे ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे माजी मंत्री तेज नारायण पांडे ‘पवन’ आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी सुल्तान यांचे खूप चांगले संबंध असल्याचेही उघड झाले आहे.
सुल्तान यांनी समाजवादी पक्षाकडून नगरसेवकपदाची निवडणूकही लढविली आहे. दैनिक भास्करने यासंदर्भात तेज नारायण पांडे यांच्याशी याबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, हा आरोप तथ्यांच्या आधारे केला. सुल्तान अन्सारीच्या सांगण्यावरून केला नाही. पांडे म्हणाले की, आतापर्यंत राम मंदिराच्या जमिनीसंदर्भात ५० हून अधिक नोंदणी झाल्या आहेत. प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. मग, माझा आरोप खरा की खोटा हे स्पष्ट होईल.
११ पॉइंटमध्ये जमीन खरेदीची प्रक्रिया
सुल्तानने २०११ मध्ये, दोन कोटींच्या करार करून जमीन ताब्यात घेतली होती. ती ट्रस्टला विकण्यापूर्वी, जुनी किंमत दिल्यानंतर, त्याचे नाव (सरकारी कागदपत्रातील एखाद्याच्या नावे बनवायचे) असे ठेवले. त्यानंतर जमिनीची विक्री केली. राम मंदिर ट्रस्टला १८ कोटींना देईन, असे म्हंटले होते. म्हणजे जमिनीची किंमत १९ मिनिटात नव्हे तर १० वर्षांत 2 कोटींवरून १८.५ कोटीवर गेली आहे.
१ ) केंद्र सरकारने राम मंदिर ट्रस्टला मंदिरासाठी ७० एकर जमीन दिली आहे. ही जमीन केंद्र सरकारने ताब्यात घेतली.
२) ट्रस्टने मंदिराच्या विस्ताराची योजना तयार केली. मंदिर संकुलाचा विस्तार १०८ एकरात होईल, असा निर्णय घेण्यात आला. यासाठी ट्रस्टने मंदिराच्या सभोवतालची जमीन खरेदी करण्यास सुरवात केली.
३ ) मंदिराच्या सभोवतालच्या ७० एकर जागेची खरेदी सुरू केली.
४ ) बाग बिजाई येथील जमीन खरेदीबद्दल ट्रस्टवर आरोप झाले. ती जमीन २०१० पूर्वी प्रॉपर्टी डीलर फिरोज खानच्या नावावर होती.
५) फिरोजने २०१० मध्ये बबलू पाठक यांना १८० बिस्वा जमीन विकली होती.
६) ४ मार्च २०११ रोजी बबलू पाठक यांनी इरफान खान उर्फ नन्हे मियांबरोबर १०० बिस्वा जमिनीचा एक कोटी रुपयांचा करार केला होता. मग त्या नन्हे मियाने बाबलूला अडव्हान्स म्हणून १० लाख रुपये दिले. हा करार तीन वर्षांचा होता. नन्हे यांचा मुलगा सुल्तान अन्सारी आणि बबलू पाठक यांच्यात चांगली मैत्री आहे.
७) ४ मार्च २०१४ रोजी जुना करार आपोआप रद्द झाला. म्हणूनच, 2015 मध्ये बबलूने पुन्हा तीच जागा नन्हेचा मुलगा सुल्तान अन्सारीच्या नावे हस्तांतरित केली. अशाप्रकारे, २०११ ते २०२० पर्यंत दर तीन वर्षांनी त्या काळाच्या दरानुसार कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावे करार होत राहिले.
८ ) सर्वात शेवटी २०१९ मध्ये जमिनीचा करार झाला. तेव्हा किंमत २.१६ कोटी होती. करारानुसार ही जमीन सुल्तानच्या नावावर २.१६ कोटी रुपये दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. बबलू आणि सुल्तान यांच्यात जमिनीबाबत सामंजस्य होते.
९ ) राम मंदिर ट्रस्टला या जागेची गरज होती तेव्हा ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी बबलू आणि सुल्तान यांच्याकडे संपर्क साधला. चर्चा तीन महिन्यांपर्यंत चालू होती. मार्च २०२१ मध्ये चंपत राय यांनी बबलूकडून ८० बिस्वा जमीन ८ कोटी रुपयांना विकत घेतली. उर्वरित १०० बिस्वा जमीन ( तीन एकर) सुल्तानकडून १८.५ कोटी रुपयांना खरेदी केली.
१०) ट्रस्टच्या नावावर जमीन देण्यापूर्वी सुल्तानने बबलू पाठक यांना १०० बिस्वा जागेची उर्वरित किंमत म्हणजेच १.९० कोटी रुपये देऊन नावे केली. या दोघांच्या जागेच्या खर्चासंदर्भात आधीच करार झाला असल्याने सुल्तानला त्यासाठी फक्त दोन कोटी रुपये द्यावे लागले.
११) डीड झाल्यानंतर सुल्तानने जी जमीन दोन कोटी रुपये खरेदी केली होती, ती ट्रस्टला १८.५ कोटी रुपयांना विकली . आजच्या तारखेमध्ये या जागेचा शासकीय दर सुमारे ६ कोटी आहे, तर बाजारभाव २० कोटी आहे.
राम मंदिराचा निर्णय येताच जागेची किंमत वाढली
राम मंदिराच्या बाजूने निकाल लागताच अयोध्येत जमिनीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. जिल्ह्यात सध्या बिस्वा जमिनीचा दर 20 लाख ते 50 लाख रुपये आहे. उत्तर प्रदेश सरकार बर्याच योजनांसाठी जमीन संपादन करीत आहे. यामुळे जमिनीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. अयोध्येत हॉटेल, मॉल्स आणि बाजारपेठा उघडण्यासाठी मोठे व्यापारी जमीन घेत आहेत. अनेक प्रकारचे उद्योगही पुढे येणार आहेत.
माजी मंत्री तेज नारायण पांडे पवन यांचे आरोप
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री तेज नारायण पांडे पवन यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर जमीन खरेदीतील भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, जमीन २ कोटी रुपयांची नावे ठरली होती. त्यावर १० मिनिटांत १८.५० कोटी रुपयांवर स्वाक्षरी करण्यात आली. ही जमीन सदर तहसील परिसरातील बाग बिजाई येथे असून त्याचे क्षेत्र 12 हजार 80 चौरस मीटर आहे, असा आरोप पांडे यांनी केला आहे.
दहा मिनिटांत १८.५० कोटीचा व्यवहार ?
ही जमीन साधू तेज मोहन तिवारी आणि सुल्तान अन्सारी यांच्या नावे होती. अगदी दहा मिनिटांत हा व्यवहार झाला. ही जमीन ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या नावे १८.५० कोटीना विकली आहे. हा करार १८ मार्च २०२१ रोजी करण्यात आला, असा आरोप नारायण पांडे पवन यांनी केला.
17 कोटीच्या आरटीजीएसच्या चौकशीची मागणी
पांडे यांनी आरटीजीएस केलेल्या 17 कोटींच्या रक्कमेच्या चौकशीची मागणी केली. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की हे पैसे कुठे गेले हे निश्चित केले पाहिजे आणि भ्रष्टाचारात सामील झालेल्यांवर कारवाई केली पाहिजे. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि महापौर ऋषिकेश उपाध्याय हे नोंदणीकृत कराराचे साक्षीदार आहेत.