न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे.
विशेष प्रतिनिधी
अलाहाबाद : ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज म्हणजेच मोठा निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. हा निकाल देताना उच्च न्यायालयाने सांगितले की, व्यास तळघरात हिंदू बाजूची पूजा सुरूच राहणार आहे. Allahabad High Courts Big Decision on Gyanvapi Case Puja will continue in the vyas tehkhana
यापूर्वी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयानेही हिंदूंच्या बाजूने निकाल देत मुस्लिमांच्या बाजूने झटका दिला होता. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, येथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.
ज्ञानवापीमध्ये ब्रह्म मुहूर्तामध्ये विधीनुसार पार पडली मंगला गौरीची पूजा
ज्ञानवापी प्रकरणात वकील प्रभा पांडे म्हणाले की, आज न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली आहे… पूजा सुरूच राहील… हा सनातन धर्माचा मोठा विजय आहे… ते (मुस्लीम बाजू) याचा आढावा घेऊ शकतात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात.
ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतजामियाच्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत, म्हणजे जी पूजा सुरू होती ती तशीच सुरू राहील… जर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर सर्वोच्च न्यायालयातही आमचे म्हणणे मांडू.