Wednesday, 7 May 2025
  • Download App
    अलाहाबाद हायकोर्टाचे आदेश : मथुरेतील वादग्रस्त जागेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा मुद्दा 4 महिन्यात निकाली काढा!!|Allahabad High Court orders: Settle the issue of scientific survey of the disputed site in Mathura in 4 months!

    अलाहाबाद हायकोर्टाचे आदेश : मथुरेतील वादग्रस्त जागेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा मुद्दा 4 महिन्यात निकाली काढा!!

    वृत्तसंस्था

    लखनौ : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या अर्जावर 4 महिन्यात सुनावणी पूर्ण करा, असे निर्देश अलाहबाद हायकोर्टाने जिल्हा न्यायालयाला दिले आहेत.Allahabad High Court orders: Settle the issue of scientific survey of the disputed site in Mathura in 4 months!

    मुघल बादशाह औरंगजेबच्या काळात मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी मंदिरावर आक्रमण करून ईदगाह मशिद उभारली आहे. याच संदर्भात हिंदु-मुस्लीम पक्षात वाद आहेत. याप्रकरणी सुमारे दीड वर्षापूर्वी याचिकाकर्ते मनीष यादव यांनी अधिवक्ता रामानंद गुप्ता यांच्या माध्यमातून मथुरा येथील जिल्हा न्यायालयात अर्ज सादर करून ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती.



    अर्जानुसार, भगवान श्रीकृष्ण विराजमान समितीने वादग्रस्त जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि देखरेखीसाठी न्यायालय कमिशनरची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. परंतु, या अर्जावर गेल्या वर्षभरात काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी अलाहबाद हायकोर्टात धाव घेतली. याचिकाकर्ते मनीष यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून सुनावणी लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच हायकोर्टाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

    याप्रकरणी न्या. पीयूष अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयाने मथुरा जिल्हा न्यायालयाला 4 महिन्यांत सुनावणी पूर्ण करून शाही ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करणारा अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले. या अर्जावर हायकोर्टाने अधीनस्थ न्यायालयाकडून अहवाल मागवला होता. सोमवारी उच्च न्यायालयाने हा अर्ज निकाली काढताना मथुरा जिल्हा न्यायालयाला मनीष यादव यांच्या अर्जावर 4 महिन्यांत सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याचे निर्देश दिले.

    Allahabad High Court orders: Settle the issue of scientific survey of the disputed site in Mathura in 4 months!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले

    Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप

    Rashid Alvi : ‘प्रत्येक दहशतवादी मारला गेला का, दुसरा पहलगाम होणार नाही?’