• Download App
    मोठी बातमी : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या ASI सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थगिती । allahabad high court directs asi to stop survey of gyanvapi masjid in varanasi

    मोठी बातमी : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या ASI सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थगिती

    survey of gyanvapi masjid in varanasi : वाराणसीतील काशी विश्वेश्वर नाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला. न्यायालयाने एएसआयला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्यापासून रोखले. न्यायमूर्ती प्रकाश पांडिया यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. allahabad high court directs asi to stop survey of gyanvapi masjid in varanasi


    वृत्तसंस्था

    प्रयागराज : वाराणसीतील काशी विश्वेश्वर नाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला. न्यायालयाने एएसआयला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्यापासून रोखले. न्यायमूर्ती प्रकाश पांडिया यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.

    कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

    न्यायमूर्ती प्रकाश पांडिया यांनी ASIला सर्वेक्षण थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्यापासून रोखले आहे. कनिष्ठ न्यायालयाने ASI ला एक सर्वेक्षण करून ते काशी विश्वनाथ मंदिर आहे की नाही, हे ठरवण्यास सांगितले होते. उच्च न्यायालयाने वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणीला स्थगिती दिली आहे.

    गत सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. वाराणसी न्यायालयाने मशिदीच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाला परवानगी दिली होती. मुस्लिम पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मशीद व्यवस्था समिती, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड यांनी याचिका दाखल केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी प्रसिद्ध काशी विश्वेश्वर नाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणात आपला निकाल राखून ठेवला होता. या वादात दिवाणी न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान देण्यात आले. दिवाणी न्यायाधीशांनी एएसआयला उत्खननाचे आदेश दिले होते.

    औरंगजेबाने मंदिराचा केला होता विध्वंस

    न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पूजास्थळ (विशेष तरतुदी) कायदा 1991 च्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. मंदिराच्या पक्षकारांनुसार, 1664 मध्ये मुघल शासक औरंगजेबाने मंदिर नष्ट केले आणि अवशेषांवर मशीद उभारली होती.

    allahabad high court directs asi to stop survey of gyanvapi masjid in varanasi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य