• Download App
    नूपुर शर्मा : सर्वपक्षीय नेते राज्यसभा निवडणुकीत दंग; लाखो मुस्लिम निदर्शनांसाठी रस्त्यावरAll party leaders stunned in Rajya Sabha elections; Millions of Muslims take to the streets in protest

    नूपुर शर्मा : सर्वपक्षीय नेते राज्यसभा निवडणुकीत दंग; लाखो मुस्लिम निदर्शनांसाठी रस्त्यावर

    प्रतिनिधी

    मुंबई : एका बाजूला राज्यसभेसाठी मतदान सुरु असताना सर्वपक्षीय नेते निवडणुकीत दंग होते, तर दुसरीकडे देशात आणि महाराष्ट्रात सोलापूर आणि औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणीत लाखोंच्या संख्येने मुस्लिम समाज रस्त्यावर उतरण्याची तयारी करत होते. शुक्रवारी, १० जून रोजी  संध्याकाळचे नमाज पठन केल्यावर लाखोंच्या संख्येने मुस्लिम समाज महाराष्ट्रात रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे काही काळ याठिकाणी वातावरण तणावग्रस्त बनले होते. भाजपचे निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रोफेट मोहम्मद याच्या विरोधात काढलेल्या कथित गैरउद्गारांच्या विरोधात ही निदर्शने होती. All party leaders stunned in Rajya Sabha elections; Millions of Muslims take to the streets in protest

    एमआयएमने काढला मोर्चा 

    विशेष म्हणजे हे मोर्चे एमआयएमच्या नेतृत्वाखाली काढण्यात आले होते. सोलापूर आणि औरंगाबाद येथे मोर्चा काढला होता. या मोर्च्यात अनेक मुस्लिम संघटना एकत्र झाल्या होत्या. यावेळी ५०० जण जमतील असे पोलिसांना सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात मात्र ५ ते ६ हजारांचा जमाव जमला होता. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले होते. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे कालपर्यंत महाविकास आघाडी राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएमने पाठिंबा द्यावा, अशी विनंती एमआयएमकडे करत होती, अखेरीस एमआयएमने एका बाजूला महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आणि दुसऱ्या बाजूला सोलापूर आणि औरंगाबाद येथे हजारोंच्या संख्येने मुस्लिमांनी निदर्शने केली, हा योगायोग आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मोर्चाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलकांना शांत केले. मात्र नुपूर शर्मा यांची केवळ पक्षातून हकालपट्टी करणे ही कारवाई योग्य नाही, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

    – मोर्च्यात दंगलखोर सामील

    या आंदोलनात दंगलखोर, नशेबाज तरुण सहभागी झाले होते, त्यांची ओळख त्वरित पटवून देण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. औरंगाबादमधील वातावरण आम्ही कदापि बिघडू देणार नाही, असेही जलील म्हणाले.

    दिल्लीसह उत्तर प्रदेशातही हिंसक निदर्शने

    दिल्लीतील जामा मशिदी बाहेरच्या निदर्शनानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपूर, मुरादाबाद आणि प्रयागराजच्या रस्त्यावर हजारो मुस्लिमांनी मोर्चा काढत दुकाने बंद करण्यास लावले, तर प्रयागराजमधील एका भागात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. कर्नाटकातील हुबळी बंगलोर आदी शहरांमध्ये मोर्चे काढले झारखंडमधील रांची जमावाने वाहने जाळली. मागील काही तासांपासून येथील परिस्थिती अस्थिर आहे. प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दंगल उसळली होती. यामध्ये जवळपास ४० लोक जखमी झाले होते.

    All party leaders stunned in Rajya Sabha elections; Millions of Muslims take to the streets in protest

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य