• Download App
    Devendra Fadnavis फडणवीसांच्या वर्चस्वाची कबुली द्यायची सुप्रिया सुळे + रोहित पवारांवर वेळ; तिसऱ्या उपमुख्यमंत्र्याची पुडी सोडायची राऊतांना कळ!!

    Devendra Fadnavis : फडणवीसांच्या वर्चस्वाची कबुली द्यायची सुप्रिया सुळे + रोहित पवारांवर वेळ; तिसऱ्या उपमुख्यमंत्र्याची पुडी सोडायची राऊतांना कळ!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणापासून ते राज्यातला कायदा सुव्यवस्थेपर्यंत प्रत्येक विषय देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेऊन भिडवत त्यांनाच टार्गेट करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर आता मात्र मंत्रिमंडळावर फक्त देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व असल्याचे कबुली द्यायची वेळ आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार नेमके काम करतात तरी काय??, असा असा सवाल विचारायची वेळ रोहित पवारांवर आली, तर महाराष्ट्राला लवकरच तिसरा मुख्यमंत्री मिळेल अशी संजय राऊत यांनी “कळ” काढली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उरल्या सुरल्या विरोधकांची अशी वाट लागली.

    महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतात. बाकीचे मंत्री कुठे काम करताना दिसतच नाहीत, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी अनेकदा केले होते. त्याचेच रिपीटेशन आज त्यांनी कोल्हापुरात केले. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे “वन मॅन शो” झाला आहे, असे त्या म्हणाल्या. या त्याच सुप्रिया सुळे आहेत, ज्यांनी अकेला देवेंद्र क्या करेगा??, असा सवाल विचारला होता. परंतु, आता याच देवेंद्र फडणवीस यांना “वन मॅन शो” म्हणायची वेळ सुप्रिया सुळे यांच्यावर आली. Devendra Fadnavis


    शिवसेना (उबाठा) + राष्ट्रवादी (शप) मधल्या बड्या नेत्यांना सत्तेच्या वळचणीला येण्याची इच्छा; पण भाजपने लावला फिल्टर!!


    आमदार रोहित पवारांनी देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. सध्या या दोघांचा हनिमून टाइम चालू आहे. पण ते आपापल्या मंत्र्यांनी सांगितलेली कामे करून साधे समाधान देखील करू शकत नाहीत. पालकमंत्री पदाचा वाद सोडवू शकत नाहीत. ते महाराष्ट्राच्या जनतेचे समाधान काय करणार??, असा सवाल रोहित पवारांनी केला.Devendra Fadnavis

    याच दरम्यान संजय राऊत यांनी सकाळची नियमित पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल, असे सांगून दोन उपमुख्यमंत्र्यांना डिवचले. त्यांनी उदय सामंत यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. पण या सगळ्यांमध्ये मंत्रिमंडळावर फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच वर्चस्व आहे, याची अप्रत्यक्ष कबुली सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि संजय राऊत या नेत्यांनी दिली. या तीनही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी फक्त फडणवीस यांनाच टार्गेट करून त्यांच्या राजकीय क्षमते विषयी ठळक प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. पण आता या नेत्यांना आपली जुनी भूमिका 360° मध्ये बदलून फडणवीसांच्या वर्चस्वाची कबुली द्यावी लागली.

    All opposition leaders now praise Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!