• Download App
    समस्त भारतीयांना आता गोलंदाजांकडून 1983 च्या पुनरावृत्तीची अपेक्षा!! All Indians now expect a repeat of 1983 from the bowlers!!

    समस्त भारतीयांना आता गोलंदाजांकडून 1983 च्या पुनरावृत्तीची अपेक्षा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्ड कप फायनल कडे डोळे लावून बसलेल्या समस्त भारतीयांना आता 1983 च्या पुनरावृत्तीच्या अपेक्षा आहे. कारण 1983 प्रमाणेच पहिली फलंदाजी करून भारताचा स्कोअर कमी झाला आहे, पण 1983 मध्ये जशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून भारताला वर्ल्डकप मिळवून दिला होता, 2023 मध्ये पण गोलंदाजांनीच कामगिरीची पुनरावृत्ती करून भारताला वर्ल्डकप मिळवून द्यावा, अशी आशा आणि अपेक्षा समस्त भारतीयांनी मनात धरली आहे.

    1983 मध्ये कपिल देवच्या भारतीय संघाने चमत्कार घडवून बलाढ्य वेस्टइंडीजला पराभूत करत वर्ल्डकप वर पहिल्यांदाच भारताचे नाव कोरले होते. पण त्यावेळी कृष्णमाचारी श्रीकांत 38, मोहिंदर अमरनाथ 26 आणि संदीप पाटील 27 एवढेच फक्त बरे स्कोअरर बॅटर होते.

    पण त्यावेळी अष्टपैलू मोहिंदर अमरनाथने उत्तम टाइमिंग साधत बलाढ्य वेस्टइंडीजच्या तीन विकेट्स घेतल्या आणि भारताला वर्ल्डकप मिळवून दिला होता.

    2023 मध्ये देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा स्कोअर 240 एवढा कमी झाला आहे. त्यामुळे भारताची सर्व मदार गोलंदाजांवर आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव हे गोलंदाज फॉर्म मध्ये आहेत. त्यांनी अचूक गोलंदाजी करून टप्प्याटप्प्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 6 विकेट्स काढल्या तर 2023 चा वर्ल्डकप भारताच्या नजरेच्या टप्प्यात येऊ शकतो.

    तसेही 2023 च्या वर्ल्ड कप मध्ये लीग सामन्यांमध्ये इंग्लंड विरुद्ध भारताने सर्व बाद 229 एवढा कमी स्कोअर केला असताना भेदक गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडला 100 धावांनी हरविले होते. ऑस्ट्रेलियाला देखील पहिल्या डावात 199 धावांमध्ये गुंडाळून नंतर 4 बाद 201 अशा धावा करून पराभूत केले होते. त्यामुळेच आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनल मॅच मध्ये भारतीय गोलंदाजांकडून अपेक्षा वाढली आहे.

    All Indians now expect a repeat of 1983 from the bowlers!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!