वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारचे कायदेमंत्री किरण रिजिजू हे Waqf board सुधारणा विधेयक लोकसभेत मांडत असतानाच, दुसरीकडे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन देशभरात आंदोलन भडकवायची तयारी असल्याची धमकी दिली.All India Muslim Personal Law Board threatens to incite nationwide agitation even before the Waqf Board Amendment Act is passed!!
केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत waqf board सुधारणा कायदा 2024 हे विधेयक मांडले. त्यावेळी बोलताना त्यांनी, जमीन का दर्द आसमां क्या समजेगा?? ही काव्य पंक्ती सादर केली. त्याचवेळी त्यांनी waqf board सुधारणा कायदा का आणावा लागला??, याचे सविस्तर विवेचन केले. Waqf board ने दिल्लीत 123 प्रॉपर्टीज वर दावा केला. त्यामध्ये पार्लमेंट बिल्डिंगचा देखील समावेश राहिला. आज आपण ज्या पार्लमेंट मध्ये बसतोय ते पार्लमेंट देखील waqf प्रॉपर्टी झाले असते, असा इशारा किरण रिजिजू यांनी दिला.
परंतु किरण रिजिजू हे लोकसभेत संबंधित विधेयक मांडत असताना दुसरीकडे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकार विरोधात देशभरात आंदोलन भडकवण्याची भाषा केली. Waqf board सुधारणा बिल मुसलमानांचा विश्वासघात करून आणले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बॉल लॉ बोर्डाने संसदीय समितीला पाच कोटी सूचना पाठवल्या होत्या. परंतु, त्याची दखल संसदीय समितीने घेतली नाही. संसदीय समितीने waqf board सुधारणा विधेयक अधिक गुंतागुंतीचे करून ठेवले. त्यांनीच जास्त घोळ घालून ठेवला.
त्यामुळे मुसलमानांच्या प्रॉपर्टीज, मशिदी, अन्य प्रार्थना स्थळे धोक्यात आली. मोदी सरकारने Waqf सुधारणा कायद्यामध्ये प्रावधानेच अशी केली की, त्यामुळे सरकारच्या बाजूनेच निर्णय होईल. मुसलमानांवर अन्याय होईल, पण आम्ही हे गप्प बसून सहन करणार नाही. राज्यघटनेनुसार कायद्याची सगळी हत्यारे आजमावू. सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढू. देशभर आंदोलन पेटवू, अशी धमकी भरली भाषा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव मौलाना मोहम्मद फजलूर रहीम मुजद्दीदी आणि प्रवक्ते सय्यद काशीद रसूल एलियासी यांनी वापरली.
All India Muslim Personal Law Board threatens to incite nationwide agitation even before the Waqf Board Amendment Act is passed!!
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात ए.आय. आधारित डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी
- Waqf board bill : उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सिद्ध करायची संधी, चतुर असतील तर करू शकतात पुढची राजकीय पेरणी!!
- Kapil Mishra : दिल्ली दंगलीप्रकरणी कपिल मिश्रा यांना मोठा धक्का
- Reserve Bank of India : भारताची आर्थिक प्रगती संचलित करणारी भारतीय रिझर्व्ह बँक!