• Download App
    कोरोनाच्या सावटामुळे युरोप पुन्हा हादरले, आता बालकांच्या लसीकरणाला सुरुवात । All Europe again afraid due to corona

    कोरोनाच्या सावटामुळे युरोप पुन्हा हादरले, आता बालकांच्या लसीकरणाला सुरुवात

    वृत्तसंस्था

    अथेन्स : ग्रीससह युरोपमधील काही देशांनी पाच ते ११ या वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग आणि आगामी नाताळच्या सुट्यांचा काळ यामुळे लसीकरण मोहिमेला सर्व देशांनी वेग दिला आहे. All Europe again afraid due to corona

    इटली, हंगेरी आणि स्पेन या देशांनीही लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली आहे. संसर्गवाढीमुळे पालकही आपल्या मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही असून ग्रीसमध्ये ३० हजार जणांनी त्यासाठी नोंदणीही केली आहे. ग्रीसमध्ये काल एकाच दिवशी कोरोना संसर्गामुळे १३० व्यक्तींचा मृत्यू झाला.
    दरम्यान ब्रिटनमध्ये संसर्गवाढीने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. हा संसर्ग इतक्या वेगाने पसरत आहे की लवकरच ब्रिटनमधील सर्व रुग्णालये भरुन जातील, असा इशारा देशाचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी दिला आहे.



    संसर्गवाढीनंतर ब्रिटनमध्ये लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी हालचाली सुरु आहेत. या महिनाअखेरीपर्यंत सर्व प्रौढांना बूस्टर डोस देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संसदेत बोलताना आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी, ओमिक्रॉनचा संसर्ग अत्यंत वेगाने वाढत असल्याचे सांगितले. ‘हा विषाणू तो इतक्या वेगाने पसरत आहे की ब्रिटनची सर्व रुग्णालये भरून टाकण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे आता विषाणू विरुद्ध लसीकरण अशी नवीन शर्यत सुरु झाली आहे,’ असे जाविद यांनी संसद सदस्यांना सांगितले.

    जानेवारीच्या मध्यापर्यंत ओमिक्रॉन युरोपमध्ये सर्वत्र पसरण्याची शक्यता आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असून युरोपमधील ६६.६६ टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोना विषाणूने आणखी एकदा नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहावर पाणी फेरले, याचे दु:ख आहे.

    All Europe again afraid due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट