विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकार आहे का “फॅसिस्ट”??; गोंधळात पडले वेगवेगळे कम्युनिस्ट!!, अशी अवस्था वेगवेगळ्या कम्युनिस्ट पार्ट्यांची बनली आहे. खरंतर त्यांच्यात भांडण जुंपले आहे. कारण मोदी सरकार नेमके कसे आहे??, याची व्याख्याच त्या पोथीनिष्ठ कम्युनिस्टांना करता येईनाशी झाली आहे. All communist
मोदी सरकारवर टीका करण्यात सगळ्या कम्युनिस्ट पक्षांची एकजूट आहे, पण ती टीका नेमकी कोणत्या आ धारावर करायची??, यावर मात्र त्यांच्यात मतभिन्नता निर्माण झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस पक्ष म्हणजे CPM, भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI, कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लेनिनवादी म्हणजे CPML या पक्षांमध्ये मोदी सरकारच्या धोरणांविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजेच CPM तामिळनाडूतील मदुराई मध्ये अधिवेशन होणार आहे. त्या अधिवेशनात मंजूर करण्यात येणाऱ्या ठरावात मोदी सरकारला फॅसिस्ट म्हणणे पक्षाने नाकारून टाकले. कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या मते मोदी सरकारला “फॅसिस्ट” असे लेबल लावता येणार नाही. कारण मोदींची राजवट हिटलर किंवा मुसोलिनीच्या “क्लासिकल फॅसीझम” या संकल्पनेत बसत नाही, पण मोदींची राजवट ही “निओ फॅसिस्ट” आहे. कारण मोदींच्या राजवटीवर संघ विचारसरणीच्या लोकांचे वर्चस्व आहे. संघातले लोक “निओ फॅसिस्ट” असतात, अशी टीका त्या ठरावात करण्यात आली आहे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या या ठरावातल्या भाषेवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच CPI आणि कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लेनिनवादी CPML तीव्र टीका केली. भारतात मोदींच्या रूपाने फॅसीझमचा केव्हाच उदय झालाय. उलट गेल्या १० वर्षांच्या काळात मोदींच्या फॅसीझमने टोक गाठले. ते मार्क्सवादी कम्युनिस्टांना दिसत नाही, असे टीकास्त्र या दोन्ही पक्षांनी सोडले. काँग्रेसने देखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने मोदींच्या राजवटीला फॅसीझम मधून “क्लीन चीट” दिल्याबद्दल आक्षेप घेतला. यातून मोदींच्या राजवटी विषयी वेगवेगळ्या रंगांच्या कम्युनिस्टांमध्येच संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र समोर आले.
All communist party confused over Modi regime
महत्वाच्या बातम्या
- नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ३००० रुपये वाढून देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा!!
- Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला, कॉक्स बाजार एअरबेसवर दंगलखोरांचा हल्ला
- पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता केला जारी
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता वितरित; ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२००० कोटी रुपये जमा!!