• Download App
    चौकशीतून उघड : सुकेश चंद्रशेखरचे सर्व आरोप खरे; केजरीवालांच्या मंत्र्यांना राज्यसभेसाठी दिले ६० कोटी All allegations of Sukesh Chandrasekhar are true; 60 crore paid to Kejriwal's ministers for Rajya Sabha

    चौकशीतून उघड : सुकेश चंद्रशेखरचे सर्व आरोप खरे; केजरीवालांच्या मंत्र्यांना राज्यसभेसाठी दिले ६० कोटी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर तब्बल 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात मंडोली तुरूंगात आहे. त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सत्येंद्र जैन, महसूल मंत्री कैलाश गैहलोत आणि डीजी संदीप गोयल यांच्यावर केलेले खंडणीचे सगळे आरोप खरे असल्याचे चौकशी समितीला आढळले आहे. यामुळे आता दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. All allegations of Sukesh Chandrasekhar are true; 60 crore paid to Kejriwal’s ministers for Rajya Sabha

    नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सुकेशच्या आरोपांबाबत प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन केली होती. या समितीने सुकेशची दोनदा भेट घेतली. त्याची चौकशी केली. सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोत यांचा सुकेशशी संपर्क होता, फोन कॉल्स, चॅट, व्यवहारासाठी ठरवण्यात आलेली स्थाने या आधारे सुकेशच्या वक्तव्यात चौकशी समितीला तथ्य आढळले आहे. या चौकशीचा अहवाल नायब राज्यपालांना सादर केला आहे. लवकरच या अहवालाच्या आधारे लेफ्टनंट गव्हर्नर केंद्रीय एजन्सीकडे पुढचा तपास सोपवू शकतात.



    चौकशी समितीचा अहवाल…

    सुकेश चंद्रशेखरने सत्येंद्र जैन यांना ६० कोटी रुपये दिले. आम आदमी पार्टीकडून राज्यसभेची जागा मिळवण्यासाठी ५० कोटी आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून १० कोटी दिले होते.

    तत्कालीन महासंचालक संदीप गोयल यांना १२.५० कोटी दिले.

    दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांच्या दिल्लीतील असोला फार्म हाऊसवर सत्येंद्र जैन यांना ५० कोटी रोख ४ हप्त्यांमध्ये दिले.

    सुकेश चंद्रशेखरच्या चॅट्स, कॉल्सवरून हे स्पष्ट होते की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या आर्थिक व्यवहारांची पूर्ण माहिती होती. यासाठी तपास यंत्रणेला सुकेशचा फोन, चॅटची माहिती, लोकेशन, व्हिडिओ फुटेज देण्यात येणार आहे. असोला दिल्ली फार्म हाऊसवर सत्येंद्र जैन आणि कैलाश गेहलोत यांना पैसे दिल्यानंतर ते अरविंद केजरीवाल यांच्याशी फोनवरून बोलणे करून द्यायचे असा खुलासा सुकेशने तपास समितीसमोर केला आहे. अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्याचेही सुकेशने सांगितले आहे.

    कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

    सुकेशवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जवळपास ३२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सीबीआय, ईडी आणि आयकर तपास सुरू आहेत. सुकेश चंद्रशेखरवर प्रभावशाली असल्याचे भासवून लोकांना फसवल्याचा आरोप आहे. मोठमोठ्या व्यक्तींसोबत फोटो दाखवून तो लोकांना फसवायचा आणि त्यांच्या कामासाठी सर्वाधिक पैसे घेत असे. त्याचप्रमाणे, त्याने दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून २१५ कोटी रुपये वसूल केले होते आणि त्याच्या ओळखीच्या आधारे आपण तिच्या पतीला जामीन मिळवून देऊ असे सांगितले होते. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सुकेश तुरुंगातूनच फसवणुकीचे रॅकेट चालवत होता.

    All allegations of Sukesh Chandrasekhar are true; 60 crore paid to Kejriwal’s ministers for Rajya Sabha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Terrorist Tahawwur Rana : दहशतवादी तहव्वुर राणा 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत; सुरक्षेच्या कारणास्तव एक दिवस आधी हजेरी

    Tani community : तानी समुदायाच्या लोकांची मागणी, तानीलँडची निर्मिती करा; पोलिसांनी युनायटेड तानी आर्मीची टोळी पकडली

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण