• Download App
    INDI आघाडीतून ममतांची TMC बाहेर; बंगाल मधले सर्व 42 उमेदवार जाहीर; क्रिकेटपटू युसुफ पठाणला उतरवून काँग्रेसला डिवचले!! All 42 candidates announced in Bengal Lok Sabha

    INDI आघाडीतून ममतांची TMC बाहेर; बंगाल मधले सर्व 42 उमेदवार जाहीर; क्रिकेटपटू युसुफ पठाणला उतरवून काँग्रेसला डिवचले!!

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता : हो ना करता करता अखेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तृणमूळ काँग्रेस INDI आघाडीतून बाहेर पडली काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये लोकसभेची एकही जागा न सोडता सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 42 जागांवर ममता बॅनर्जींनी तृणमूळ काँग्रेसचे उमेदवार जाहीर करून टाकले. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये INDI आघाडी अधिकृतरित्या संपुष्टात आली आहे. All 42 candidates announced in Bengal Lok Sabha

    ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला झुलवत ठेवून अखेर पश्चिम बंगाल मधले सगळे उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांची प्रचंड चिडचिड झाली आहे. बंगालमध्ये नाही जमले तरी देशात इतरत्र INDI आघाडी म्हणूनच लढू, अशी घोषणा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश आणि अधीर रंजन चौधरी यांनी केली.

    ममता बॅनर्जींनी जाहीर केलेले यादीत सर्वांत मोठे सरप्राईज क्रिकेटपटू युसुफ पठाण याचे नाव असून त्याला ममतांनी बेहरामपूर लोकसभा मतदारसंघातून अधीर रंजन चौधरी यांच्याच विरुद्ध त्याला मैदानात उतरवले आहे. ममता बॅनर्जींनी बहरामपुर मधून मुस्लिम उमेदवार दिल्याने अधीर रंजन चौधरी हे ताबडतोब पराभवाच्या छायेत आले आहेत. त्याचबरोबर विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांचे तिकीट ममतांनी कापले आहे

     TMC ची यादी

    1 कूच बिहार (एससी)- जगदीश सी बसुनिया
    2 अलीपुरद्वार (एसटी)- प्रकाश चिक बड़ाइक
    3 जलपाईगुड़ी (एससी)- निर्मल चौधरी रॉय
    4 दार्जिलिंग- गोपाल लामा
    5 रायगंज- कृष्णा कल्याणी
    6 बालुरघाट- बिप्लब मित्रा
    7 मालदा उत्तर- प्रसून बनर्जी
    8 मालदा दक्षिण- शाहनवाज अली रैहान
    9 जंगीपुर- खलीलुर्रहमान
    10 बरहामपुर- युसूफ पठान
    11 मुर्शिदाबाद- अबू ताहेर खान
    12 कृष्णानगर- महुआ मोइत्रा
    13 रानाघाट (एससी)- मुकुट मणि अधिकारी
    14 बोंगांव- विश्वजीत दास
    15 बैरकपुर- पार्थ भौमिक
    16 दम दम- प्रोफेसर सौगत रॉय
    17 बारासात- काकोली घोष दस्तीदार
    19 जॉयनगर (एससी)- प्रतिमा मंडल
    20 मथुरापुर (एससी)- बापी हलदर
    21 डायमंड हार्बर- अभिषेक बनर्जी
    22 जादवपुर- सायोनी घोष
    23 कोलकाता दक्षिण- माला रॉय
    24 कोलकाता उत्तर- सुदीप बंधोपाध्याय
    25 हावड़ा- प्रसून बनर्जी
    26 उलूबेरिया- सजदा अहमद
    27 सेरामपुर- कल्याण बनर्जी
    28 हुगली- रचना बनर्जी
    29 आरामबाग (एससी)- मिताली बाग
    30 तमलुक- देबांगशु भट्टाचार्य
    31 कंठी -उत्तम बारिक
    32 घाटल- दीपक अधिकारी (देव)
    33 झारग्राम (एसटी)- कालीपाड़ा सोरेन
    34 मेदिनीपुर- जून मालिया
    35 पुरुलिया- शांतिराम महतो
    36 बांकुरा- अरूप चक्रवर्ती
    37 बिष्णुपुर (एससी)- सुजाता मंडल खान
    38 बर्धमान पुरबा (एससी) – डॉ शर्मिला सरकार
    39 बर्धमान दुर्गापुर- कीर्ति आजाद
    40 आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
    41 बोलपुर (एससी)- असित कुमार मल
    42 बीरभूम- शताब्दी रॉय

    All 42 candidates announced in Bengal Lok Sabha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के