• Download App
    अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्याचे ‘ISIS’शी संबंध, ‘NIA’ने केली अटक! Aligarh Muslim University students connection with ISIS  NIA arrested

    अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्याचे ‘ISIS’शी संबंध, ‘NIA’ने केली अटक!

    (संग्रहित छायाचि)

    घराच्या झडतीमधून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी साहित्य, कागदपत्रे जप्त

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी फैजान अन्सारी याला ISIS शी संबंध असल्याच्या आरोपावरून NIA ने अटक केली आहे. तपास संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) १९ वर्षीय विद्यार्थ्याला ISIS या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यापूर्वी त्याच्या झारखंडमधील घर आणि उत्तर प्रदेशातील भाड्याच्या खोलीचीही झडती घेण्यात आली. Aligarh Muslim University students connection with ISIS  NIA arrested

    १६ आणि १७ जुलै रोजी झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातील फैजान अन्सारीचे घर आणि उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील भाड्याने घेतलेल्या खोलीची झडती घेण्यात आली आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी साहित्य आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली, असे तपास संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

    एजन्सीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, अन्सारीने आपल्या साथीदारांसह भारतातील ISIS कारवायांना पाठिंबा देऊन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दहशतवादी संघटनेचा प्रचार करून गुन्हेगारी कट रचला होता. ISIS च्या वतीने भारतात हिंसक दहशतवादी हल्ले घडवून आणणे हा या कटाचा उद्देश होता.

    Aligarh Muslim University students connection with ISIS  NIA arrested

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

    Monsoon : मान्सून 4 दिवस आधी 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता; 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक