• Download App
    रणवीर सिंग आणि आलिया भट कडून पंतप्रधान मोदींचे कौतुक! जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलं कौतुक! Alia Bhatt Ranveer Singh tweet on G-20 meet pm modi

    रणवीर सिंग आणि आलिया भट कडून पंतप्रधान मोदींचे कौतुक! जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलं कौतुक!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : नुकत्याच पार पडलेल्या जी 20 परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक होतं. भारताने केलेलं सगळ्याच परदेशीय पाहुण्यांचं स्वागत, आणि पाहूणचार हा जगभरासाठी कौतुकाचा विषय ठरलाय. Alia Bhatt Ranveer Singh tweet on G-20 meet pm modi

    साऱ्या जगाला हेवा वाटावा अस जी 20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजनातील प्रत्येक बाब ही खूप विचारपूर्वक आणि भारतीय संस्कृती परंपरा , व्यापार उद्योग या सगळ्यांना लक्षात ठेवून करण्यात आली होती.

    त्यामुळे भारताने केलेल्या या सगळ्या आतिथ्याबद्दल परदेसिया पाहुणे भारावून गेले. भारत हा केवळ आता विकसनशील देश नसून, विश्वगुरू होण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र या आयोजनातून जगासमोर आलं.

    या जी 20 परिषदेच्या माध्यमातून भारत हा जगाच्या पटलावर सशक्त सक्षम असणारा देश ठरला.आणि हा सगळा भव्यदिव्य आयोजन सोहळा बघून जगभरातील अनेक मान्यवरांनी मोदींचं कौतुक केलं.
    जगभरातील वेगवेगळ्या मान्यवरांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे.बॉलीवूडचे प्रसिद्ध सेलिब्रेटी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी देखील मोदींची स्तुती केली आहे. त्यांची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

    मोदीजी तुमचे खूप खूप अभिनंदन….तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा…. जी २० मध्ये भारत जे प्रतिनिधीत्व करतो आहे त्याचे श्रेय तुम्हाला द्यावे लागेल. आपल्या देशाला खूप मोठे भविष्य आहे. वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हे महत्वाचे आहे. अशा शब्दांत रणवीरनं ट्विट केले आहे.

    Alia Bhatt Ranveer Singh tweet on G-20 meet pm modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Economy : 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5.25 पट वाढेल:अहवालात दावा- 21 वर्षांत दरडोई उत्पन्न ₹2.5 लाखांवरून वाढून ₹13.5 लाख होईल

    India Pakistan : भारत-पाकिस्तानने एकमेकांना अणु ठिकाणांची माहिती दिली; 35 वर्षांची जुनी परंपरा; ऑपरेशन सिंदूरदरम्यान किराणा हिल्सवर हल्ल्याची अफवा

    Indore : पाईपलाईनमधील गळतीमुळे दूषित पाणी; इंदूरमध्ये घातक जिवाणूमुळे 15 लोकांचा मृत्यू; मानवाधिकार आयोगाने अहवाल मागवला