विशेष प्रतिनिधी
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या जी 20 परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक होतं. भारताने केलेलं सगळ्याच परदेशीय पाहुण्यांचं स्वागत, आणि पाहूणचार हा जगभरासाठी कौतुकाचा विषय ठरलाय. Alia Bhatt Ranveer Singh tweet on G-20 meet pm modi
साऱ्या जगाला हेवा वाटावा अस जी 20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजनातील प्रत्येक बाब ही खूप विचारपूर्वक आणि भारतीय संस्कृती परंपरा , व्यापार उद्योग या सगळ्यांना लक्षात ठेवून करण्यात आली होती.
त्यामुळे भारताने केलेल्या या सगळ्या आतिथ्याबद्दल परदेसिया पाहुणे भारावून गेले. भारत हा केवळ आता विकसनशील देश नसून, विश्वगुरू होण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र या आयोजनातून जगासमोर आलं.
या जी 20 परिषदेच्या माध्यमातून भारत हा जगाच्या पटलावर सशक्त सक्षम असणारा देश ठरला.आणि हा सगळा भव्यदिव्य आयोजन सोहळा बघून जगभरातील अनेक मान्यवरांनी मोदींचं कौतुक केलं.
जगभरातील वेगवेगळ्या मान्यवरांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे.बॉलीवूडचे प्रसिद्ध सेलिब्रेटी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी देखील मोदींची स्तुती केली आहे. त्यांची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.
मोदीजी तुमचे खूप खूप अभिनंदन….तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा…. जी २० मध्ये भारत जे प्रतिनिधीत्व करतो आहे त्याचे श्रेय तुम्हाला द्यावे लागेल. आपल्या देशाला खूप मोठे भविष्य आहे. वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हे महत्वाचे आहे. अशा शब्दांत रणवीरनं ट्विट केले आहे.
Alia Bhatt Ranveer Singh tweet on G-20 meet pm modi
महत्वाच्या बातम्या
- ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर 6.83 टक्क्यांवर; भाज्यांचे दर घसरल्याने घट, जुलैमध्ये होता 7.44%
- दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ची आज होणार बैठक; संयुक्त प्रचार, संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत चर्चा
- लिबियात वादळ, पुरामुळे 3 हजार जणांचा मृत्यू; 123 जवानांसह 10 हजार लोक बेपत्ता
- राजस्थानमध्ये काँग्रेसला घरचा आहेर! आमदाराने मुंडन करत मु्ख्यमंत्री गेहलोत यांना पत्राद्वारे सुनावले