Alert For LIC Customers : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) म्हटले आहे की, १० मेपासून त्यांची सर्व कार्यालये आठवड्यातून पाच दिवस काम करतील. शनिवारीही विमा कंपनीला सुटी जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 15 एप्रिल 2021 रोजीच्या अधिसूचनेत जाहीर नोटीसमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने प्रत्येक जीवन-विमा महामंडळासाठी दर शनिवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे, अशा परिस्थितीत सर्व पॉलिसीधारक व इतरांना हे सूचित केले जात आहे की, 10 मेपासून सर्व एलआयसी कार्यालये सोमवार ते शुक्रवारदरम्यान कार्यरत असतील. Alert for LIC customers, LIC Office Timings are changing From May 10th
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) म्हटले आहे की, १० मेपासून त्यांची सर्व कार्यालये आठवड्यातून पाच दिवस काम करतील. शनिवारीही विमा कंपनीला सुटी जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 15 एप्रिल 2021 रोजीच्या अधिसूचनेत जाहीर नोटीसमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने प्रत्येक जीवन-विमा महामंडळासाठी दर शनिवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे, अशा परिस्थितीत सर्व पॉलिसीधारक व इतरांना हे सूचित केले जात आहे की, 10 मेपासून सर्व एलआयसी कार्यालये सोमवार ते शुक्रवारदरम्यान कार्यरत असतील.
काय आहे नवा नियम?
नवीन नियमांतर्गत एलआयसी कार्यालयात 10 मेपासून सुरू होणार्या आठवड्यात फक्त 5 दिवस काम केले जाईल. आता शनिवारी दर आठवड्याला सार्वजनिक सुटी म्हणूनही मानले जाईल. याचा अर्थ असा की, आता जर आपण शनिवारी एलआयसीच्या कार्यालयात गेला तर आपल्याला परत यावे लागेल. आता तुम्हाला आपल्या कामासाठी एलआयसी कार्यालयात जायचे असेल, तर सोमवार ते शुक्रवारदरम्यानच जाता येईल. यापूर्वी साप्ताहिक सुटी केवळ रविवारी दिली जात होती, परंतु आता नवीन नियमानंतर सलग दोन दिवस सुटी असेल.
काय असेल टायमिंग?
नवीन नियमानुसार एलआयसी कार्यालयात कामकाजाचा कालावधी सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या वेळेत असेल. याशिवाय शनिवार आणि रविवारी सुटी असेल. अलीकडेच, सरकारने नेगोशिटेबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट 1881च्या कलम 25 अंतर्गत दिलेल्या शक्तीच्या आधारे हा बदल केला आहे. यापूर्वी असेही वृत्त होते की, एलआयसी कर्मचार्यांच्या पगारामध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाईल. याचा फायदा एलआयसीच्या सुमारे 1.14 लाख कर्मचार्यांना होईल.
Alert for LIC customers, LIC Office Timings are changing From May 10th
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांनी सोशल मीडियावर काय करावे व काय करू नये यासाठी केंद्राचे नवे धोरण, युजर्सशी वाद टाळण्याचा सल्ला
- India Corona Cases Updates : देशात सलग दुसऱ्या दिवशी ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मागच्या १० दिवसांत दर तासाला १५० मृत्यू
- RRR खतरनाक ! स्टँड टुगेदर : टीम एस. एस.राजामौली आलिया,अजय देवगणसह राम चरणचा स्पेशल संदेश
- औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना चोपा; अभिनेता रितेश देशमुख याचे ट्विट
- Coronavirus Third Wave : तिसरी लाट कशी रोखणार ? , सर्वोच्च न्यायालयाचा सवाल ; लहान मुलांना कोरोना झाल्यास पालकांनी काय करायचं?