विशेष प्रतिनिधी
लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रविवारी अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या अन्सार अल कायदा हिंद विंगच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.त्यांना अयोध्येतील राम मंदिर परिसरात स्फोट करायचेहोते असे उघड झाले आहे.Al Qaeda terroristsplanned to carry out an explosion in the vicinity of the Ram Temple
मिनहाज अहमद आणि मसीरुद्दीन उर्फ मुशीर या दोघांची एटीएसने १४ दिवसांची कोठडी घेतली आहे. दोघांच्या चौकशीत अतिशय महत्त्वाची माहितीही समोर आली आहे. राम मंदिरावर निर्णय आल्यानंतर हे दहशतवादी बॉँबस्फोट मालिका घडवण्याचा कट रचत होते. यासाठी अल कायदाचे हे मॉड्यूल बनवण्यात आले.
यासाठी नव्या तरुणांना भरती केलं गेलं. त्यांना आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार करण्यात आलं. कमी पैशात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षणही दिलं गेलं. तसंच यात सामिल ७ तरुणांनी दोन वर्षांपूर्वी अयोध्येत बाइकवर फिरून राम जन्मभूमी परिसराची रेकी केली होती, असं आयबीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
यापूर्वी मिनहाज आणि मसीरुद्दीनच्या चौकशीत एटीएसला महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. यूपीत अल कायदाचे दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या प्रयत्नात होते. १५ ऑगस्टला बॉम्बस्फोट मालिका घडवणार होते आणि मानवी बॉम्ब बनून देश हादरवण्याचा कट रचत होते.
या दोघांना अल कायदाचा यूपीचा कमांडर शकील हा ऑपरेट करत होता, असं एटीएसच्या चौकशीतून समोर आलं आहे.उत्तर प्रदेश एटीएसने कानपूरमध्ये मोठी कारवाई करत इथं एटीएसने दहशतवाद्यांचा एक साथीदार इरशातसह ६ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
इरशाद हा १५ ऑगस्टच्या हल्ल्यासाठी मिनहाज आणि मसीरुद्दीन यांना मदत करत होता. यातील लईक आणि आणखी एक जण हे कॅरियर आहेत. बाकीचे स्लीपर सेल आहेत. यूपी कमांडर शकीलचा इशारा मिळाल्यानंतर ते बॉम्ब आणि शस्त्रास्त्र ठिकाणावर पोहोचवणार होते.
Al Qaeda terroristsplanned to carry out an explosion in the vicinity of the Ram Temple
महत्त्वाच्या बातम्या
- खासदार संजय विखे-पाटील म्हणाले, पेट्रोल, डिझेल महागले तर काय झाले, मोफत सुविधा आणि लस मिळत आहे
- भारताला नार्को टेररचा धोका, अंमली पदार्थांविरोधात लढण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- राहूल गांधी यांचे लाडके वेणुगोपाल यांचा फोन शरद पवारांनी दिला ठेऊन, म्हणून भिजत पडले विधानसभा अध्यक्षपदाचे घोंगडे
- ओबीसींचे राजकीय भवितव्य धोक्यात आणणे महागात पडेल, प्रकाश शेंडगे यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा