• Download App
    हिजाब वादात अल कायदानेही घेतली उडी : मोस्ट वाँटेड जवाहिरी म्हणाला- हिजाब घालणे हा मुस्लिमांचा हक्क! |Al Qaeda also jumps in hijab controversy Most Wanted Zawahiri says- Hijab is the right of Muslims!

    हिजाब वादात अल कायदानेही घेतली उडी : मोस्ट वाँटेड जवाहिरी म्हणाला- हिजाब घालणे हा मुस्लिमांचा हक्क!

    कर्नाटकातील हिजाब वादात अल कायदा या दहशतवादी संघटनेनेही उडी घेतली आहे. अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीने व्हिडिओ जारी करून म्हटले की, जगभरातील मुस्लिमांनी हिजाब परिधान करण्याच्या वादावर लढणाऱ्या मुलींना उघडपणे पाठिंबा द्यायला हवा.Al Qaeda also jumps in hijab controversy Most Wanted Zawahiri says- Hijab is the right of Muslims!


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाब वादात अल कायदा या दहशतवादी संघटनेनेही उडी घेतली आहे. अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीने व्हिडिओ जारी करून म्हटले की, जगभरातील मुस्लिमांनी हिजाब परिधान करण्याच्या वादावर लढणाऱ्या मुलींना उघडपणे पाठिंबा द्यायला हवा.

    डेली मेलच्या वेबसाइटवर असलेल्या या 9 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये जवाहिरी म्हणाला – भारताच्या हिंदू लोकशाहीत मुस्लिमांचा छळ होत आहे. कर्नाटकातील हिजाबच्या वादातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुस्कानला त्याने एक उत्तम मुलगी म्हटले.



    फ्रान्स, इजिप्त आणि हॉलंड इस्लामविरोधी असल्याचे वक्तव्य

    अल कायदाच्या म्होरक्याने म्हटले की, फ्रान्स, इजिप्त आणि हॉलंड हे इस्लामविरोधी देश आहेत. यादरम्यान जवाहिरीने पाकिस्तान आणि बांगलादेशवरही जोरदार हल्ला चढवला. 2021 नंतर जवाहिरीचा हा व्हिडिओ आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अमेरिकेची गुप्तचर संस्थाही सक्रिय झाली आहे. जवाहिरी हा अमेरिकेच्या ९/११ हल्ल्यातील आरोपी आहे.

    कोण आहे अल कायदाचा प्रमुख जवाहिरी?

    अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व हाती घेतले. इजिप्तचा रहिवासी असलेला जवाहिरी डोळ्यांचा डॉक्टर होता. 2011 मध्ये तो अल कायदाचा प्रमुख बनला. जगभरात अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात असल्याचे मानले जात आहे. वयाच्या 15व्या वर्षी जवाहिरीला पहिल्यांदा अटक करण्यात आली. त्याने 1974 मध्ये कैरो युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमधून पदवी प्राप्त केली. येथे त्याचे वडील प्राध्यापक होते.

    हिजाब वादावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

    कर्नाटक उच्च न्यायालयाने हे प्रकरण फेटाळल्यानंतर हिजाबचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. 24 मार्च रोजी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात घेण्यात आले होते, त्यावर सीजेआयने सुनावणी करताना सांगितले की, याला सनसनाटी बनवू नका. आम्ही याची अर्जंट सुनावणी करणार नाहीत.

    Al Qaeda also jumps in hijab controversy Most Wanted Zawahiri says- Hijab is the right of Muslims!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे