विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – परदेशातील लोक इथे येऊन उपचार करत आहेत आणि आपण त्यांच्या मागे पळत आहोत. मला ॲलोपथी आणि औषधाला आक्षेप नाही. ते आपल्याजागी सर्वोत्तम आहे. परंतु आपण उपचारासाठी आयुर्वेदासारखी आपली पारंपरिक पद्धती का विसरत आहोत असा सवाल फिटनेससाठी ओळखले जाणार अभिनेते अक्षयकुमार यांनी कला आहे. Akshay Kumar bats for ayrveda
सध्या बाबा रामदेव आणि ॲलोपथी डॉक्टर यांच्यात वाद सुरू आहे. यादरम्यान योगगुरुंनी अक्षयकुमारचे दोन व्हिडिओ शेअर करत ट्विट केले आहे. त्यात अक्षयकुमार यांचा संदर्भ देत म्हटले की, आपण आपल्या देहयष्टीचे स्वत:च ब्रँड अम्बेसिडर व्हा. साधे आणि आरोग्यदायी जीवन जगा आणि जगाला दाखवून द्या की, हिंदुस्थानी योगा आणि आयुर्वेदातील शक्ती ही अन्य कोणत्याही इंग्रजांच्या केमिकल इंजेक्शनमध्ये नाही. शरिराचा असा कोणताही आजार नाही की त्याच्यावर आयुर्वेदातून उपचार होत नाहीत.
अक्षयकुमार पुढे म्हणतात, की आपण अलिकडेच आयुर्वेदिक आश्रमात काही दिवस व्यतित केले. या आश्रमात ते एकमेव हिंदुस्तानी होते आणि उर्वरित परकी होते. परदेशातील नागरिक आपल्या देशात बरे होत असतील तर आपण का नाही?
Akshay Kumar bats for ayrveda
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळेना, केंद्राकडून आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांना आर्थिक मदत देणे सुरूही
- नवीन पटनाईक यांनी ओडिशाची ओळख बदलली, सर्वाधिक गरीब राज्य ते संकटाशी यशस्वी मुकाबला, आता आपत्तीशी लढण्यासाठी घर घर योध्दा
- लॉकडाऊन सदृश्य निर्बंध पुन्हा वाढविले; मात्र पॉझिटिव्हिटी दर कमी असल्यास दुकानांच्या वेळा दुपारी दोनपर्यंत
- केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार
- कोविडच्या तिसऱ्या लाटेलाही तोंड देण्यास देश सज्ज; सार्वत्रिक लसीकरणाची योजना वास्तवात आणू; विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा निर्वाळा