• Download App
    भाजप पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांप्रमाणे घटनाही चिरडतील - अखिलेश यांची टीका |Akhilesh yadaw targets BJP once again

    भाजप पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांप्रमाणे घटनाही चिरडतील – अखिलेश यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    कानपूर – उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांप्रमाणे ते घटनाही चिरडून टाकतील, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी टीका केली.
    ते म्हणाले की, भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास घटना चिरडण्याची त्यांची जय्यत तयारी झालेली असेल.Akhilesh yadaw targets BJP once again

    त्यामुळेच आमचा समाजवादी विजय रथ जनतेपर्यंत जाईल आणि भाजपला सत्तेवरून घालवेल. शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान पुन्हा मिळावा म्हणून हा रथ सतत फिरत राहील. कार्यकर्त्यांनी लोकांकडे जावे आणि त्यांचा पाठिंबा मिळवावा.



    मुलायम यांनी रथयात्रेचा प्रारंभ कानपूरमधून केल्याचे नमूद करून त्यांनी सांगितले की, आमचा पक्ष विकासासाठी काम करतो. कानपूर हे मोठे औद्योगिक शहर आहे, पण आज व्यापारी संस्था बंद पडल्या आहेत.

    हे शहर रोजगार देण्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्थाही सुधारू शकते. आमचा पक्ष त्यासाठी कार्य करेल. लोक पाठिंबा देतील आणि सपाचे सरकार बहुमताने स्थापन होईल असा विश्वास वाटतो.

    Akhilesh yadaw targets BJP once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaram Bapu Bail : सुप्रीम कोर्टाने म्हटले- आसारामला आम्ही जामीन देणार नाही; जीवाला धोका असेल, तरच विचार करू; राजस्थान सरकारकडून उत्तर मागवले

    Ethanol Allocation : इथेनॉल वाटपात बदल करू नका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; सरकारने सांगितले- 20% इथेनॉल मिश्रणाचे धोरण बदलणार नाही

    19 जूनला राहुल गांधी बनले होते “परशुराम”; एक जुलैला अखिलेश बनले “कृष्ण”; पण दोघांच्याही सनातन प्रेमावर ठळक प्रश्नचिन्ह!!