• Download App
    Akhilesh Yadaw saw unrealistic dream

    मुंगेरीलाल के हसीन सपने, विधानसभेत ४०० जागा मिळवण्याचा अखिलेश यांचा हास्यास्पद दावा

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविषयी जनतेत एवढी नाराजी आहे की, २०२२ मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला ४०० जागा विजय मिळू शकतो, असा दावा पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हुरुप आणण्यासाठी हे बोलणे जरी गृहीत धरले तरी एकूणच अखिलेश यांच्यासाठी ४०० जागा जिंकणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपनेसारखेच होणार हे नक्की आहे. Akhilesh Yadaw saw unrealistic dream

    उत्तर प्रदेशात भाजपला उमेदवार मिळणेही मुश्‍कील होणार आहे, हा अखिलेश यांचा दावा तर केवळ हास्यास्पद आहे. चार वर्षांपूर्वी भाजपने सत्ता मिळताच खासदार योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवून मास्टर स्ट्रोक खेळला. भाजपच्या या रणनितीमुळे अखिलेश, मुलायम तसेच मायावती यांच्यासारखे सारे विरोधक एका झटक्यात जमिनीवर आले. योगी आदित्यनाथ यांची प्रखर हिंदुत्ववादी प्रतिमा भाजपला मारक ठरेल या हा विरोधी त्रयींचा होरा पार चुकला आहे. याउलट कठोर प्रशासनाद्वारे योगी आदित्यनाथांनी स्वतःला व भाजपला कायम अग्रेसर ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे तमाम विरोधक विखुरले आहेत.



    ‘छोटे लोहिया’ नावाने ओखळल्या जाणारे ‘सप’चे नेते जनेश्वलर मिश्र यांच्या जयंतीनिमित्त समाजवादी पक्षाने नुकतीच सर्व जिल्ह्यांमध्ये सायकल यात्रा काढली. पक्षाच्या मुख्यालयापासून सुरू झालेल्या या यात्रेत अखिलेश यांनी सहा किलोमीटर अंतरापर्यंत सायकल चालविली. त्यावेळी अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘‘पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ३५० पेक्षा जास्त जागा ‘सप’ला मिळतील असा दावा आम्ही आतापर्यंत करीत होतो. पण राज्यातील जनता सत्ताधाऱ्यांवर एवढी वैतागली आहे की, आता आम्हाला ४०० जागा मिळू शकतील. भाजप राज्यातील ब्राह्मण, दलित आणि मुस्लिमांचा अत्याचार आणि छळ करीत आहे.’’

    आयोध्येत झालेली राम मंदिराची पायाभरणी, वारणसीतून पंतप्रधान मोदीजी करीत असलेले प्रतिनिधित्व त्याचप्रमाणे योगी आदित्यनाथांची दबंग प्रतिमा या भाजपसाठी फार फायदेशीर बाबी मानल्या जात आहेत. त्याला उत्तर देण्यात विरोधक पुरते नामोहरम झाले आहेत. सत्तारुढ भाजपला टक्कर द्यायची झाल्यास समाजवादी, बसप व कॉंग्रेस या तिन्ही विरोधी पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. पण नजीकच्या काळात हे केवळ अशक्य आहेत. त्यामुळे सत्ता मिळवण्याचे अखिलेश यांचे स्वप्न सध्या तरी स्वप्नच राहील अशी शक्यता आहे.

    Akhilesh Yadaw saw unrealistic dream

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार

    India Wins : भारताने सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकला; इंग्लंडचा 100 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा