विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Akhilesh Yadavs पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातल्या INDI आघाडीच्या नेतृत्व पदासाठी राहुल गांधींचे नाव पिछाडीवर पडून आता महिना उलटला दरम्यानच्या काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव पुढे आले होते. तेही आता मागे पडून समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे नाव INDI आघाडीच्या नेतृत्व पदासाठी पुढे आले आहे. याचा अर्थ असा की मोदी विरोधातल्या आघाडीत आता नेतृत्वपदाच्या नावांची सर्कस सुरू झाली आहे. Akhilesh Yadavs
काँग्रेस आघाडीतल्या मित्र पक्षांना नीट सांभाळून घेत नाही. ते मोदी सरकार विरोधात आक्रमक भूमिका ही घेऊ शकत नाहीत. काँग्रेस फक्त अदानी मुद्द्याला चिकटून राहिली आहे, अशी तक्रार करत ममता बॅनर्जी यांनी मध्यंतरी INDI आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी दाखवली होती. त्या कोलकात्यामध्ये बसूनच आघाडीचे नेतृत्व करणार होत्या. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणकून पराभव झाला त्यामुळे ममता बॅनर्जींना काँग्रेसला टोचायची ती संधी मिळाली होती, ती त्यांनी पुरेपूर उचलली, पण म्हणून लगेच मता बॅनर्जींना INDI आघाडीने नेतृत्व सोपविले असे घडले नाही. Akhilesh Yadavs
त्यांना शरद पवार, लालूप्रसाद यादव, उद्धव ठाकरे वगैरे नेत्यांनी फक्त तोंडी पाठिंबा दिला, पण प्रत्यक्ष नेतृत्व पदाचा विषय कुठल्या बैठकीत समोरच आला नाही कारण तशी INDI आघाडीची कुठली बैठक झाली नाही आता त्या आघाडीच्या नेतृत्वपरासाठी समाजवादी पार्टीकडूनच अखिलेश यादव यांचे नाव समोर आले आहे. मात्र त्या नावाला अद्याप कोणाचा पाठिंबा मिळालेला नाही.
99 खासदारांचा राष्ट्रीय पक्ष, कायमचा खच्ची करताहेत प्रादेशिक मित्र!!
याच दरम्यान INDI आघाडीतला 99 खासदारांचा राष्ट्रीय पक्ष, कायमचा खच्ची करताहेत प्रादेशिक मित्र!! असे चित्र राष्ट्रीय पातळीवर दिसू लागले. देशातल्या ज्या राज्यांमध्ये INDI आघाडीतील घटक असलेले प्रादेशिक पक्ष अत्यंत प्रबळ आहेत तिथे 99 खासदारांच्या राष्ट्रीय पक्षाला म्हणजेच काँग्रेसला बिलकुलच राजकीय स्थान उरलेले नाही ते आणखी खच्ची करायचे काम त्याच पक्षाचे प्रादेशिक मित्र पक्ष करत आहेत.
दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये त्याचे ठळक उदाहरणे ठरली आहेत. या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी म्हणजे आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि तृणमूळ काँग्रेस यांनी 99 खासदारांच्या राष्ट्रीय पक्षाचे वर्चस्व पूर्ण झुगारून टाकले. ममता बॅनर्जींनी INDI आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडून काढून घेऊन ते आपल्याकडे स्वीकारण्याची तयारी दाखवली. ममतांना अखिलेश यादव, शरद पवार, लालूप्रसाद यादव, उद्धव ठाकरे या नेत्यांनी फक्त तोंडी पाठिंबा दिला.
Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट
अखिलेश यादव उत्तर प्रदेशात आता INDI आघाडी म्हणून नव्हे तर “पीडीए” अर्थात पिछडा + दलित + आदिवासी आघाडी म्हणून वाटचाल करत आहेत. ते त्यांच्या सगळ्या पत्रकार परिषदा “पीडीए” आणि समाजवादी पार्टीच्या बॅनरखाली घेतात. पण तरीदेखील ममता बॅनर्जी किंवा अखिलेश यादव यांनी काँग्रेसला INDI आघाडीतून बाहेर काढायची भाषा वापरली नव्हती, ती भाषा आम आदमी पार्टीने वापरली.
आम आदमी पार्टीने 99 खासदारांच्या राष्ट्रीय पक्षालाच INDI आघाडीतून बाहेरचा रस्ता दाखवायचे मनसूबे आखले. देशाच्या राजकीय इतिहासातली ही पहिली अनोखी राजकीय घटना ठरली, ज्यात एका राष्ट्रीय पक्षाला दुसऱ्या प्रादेशिक पक्ष आपल्या राष्ट्रीय पातळीवरील आघाडीतून बाहेर काढतो आहे, किंबहुना तशी धमकी देतो आहे.
याचा अर्थच काँग्रेस नावाच्या व्यापक राजकीय छत्रीचा देशाच्या आणि राज्यांच्या राजकारणातला उपयोग आता संपला असून त्या छत्रीला ठिकठिकाणी भोके पडली आहेत, किंबहुना भगदाडे पडली आहेत.
आत्तापर्यंत राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्या नात्यांमध्ये राष्ट्रीय पक्षाचे वर्चस्व झुगारणे आणि स्वतंत्र प्रादेशिक पक्ष निर्माण करणे किंवा अस्तित्व निर्माण करणे हे वर्षानुवर्षे घडत आले होते. किंबहुना तसा पायंडा पडला होता म्हणूनच देशातल्या जवळ – जवळ प्रत्येक राज्यांमध्ये एक वेगळी काँग्रेस अस्तित्वात आली. अनेक ठिकाणी राज्यकर्ती बनली, समाजवादी विचारसरणीच्या कुठल्याही पक्षाची जननी काँग्रेसच होती, पण यापैकी कुठल्याही प्रादेशिक पक्षाने मूळ काँग्रेसलाच राष्ट्रीय पातळीवरच्या आघाडीतून बाहेर काढण्याचा प्रकार आतापर्यंत केला नव्हता, तो आता आम आदमी पार्टी करू पाहत आहे. याचा अर्थ आम आदमी पार्टीची हिंमत वाढली असा काढण्यापेक्षा काँग्रेसची राजकीय किंमत कमी झाल्याचा काढणे समयोचित ठरेल.
त्यापलीकडे जाऊन हे सगळे प्रादेशिक पक्ष काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला एवढे खच्ची का करत आहेत??, याचे उत्तर सरळ आणि साधे आहे. “काँग्रेस जेवढी प्रबळ, तेवढे प्रादेशिक पक्ष दुर्बळ”, हे “राजकीय इंगित” बाकी कुठल्याही घटकांपेक्षा प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना समजले आहे
Akhilesh Yadavs name for INDI alliance leadership post
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Chennai rape case : चेन्नई रेप केस- पोलिसांनी पीडितेची ओळख उघड केली; निषेधार्थ अण्णामलाई यांनी स्वत:ला चाबकाचे फटके मारले